IMPIMP

Pune PMC News | यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिक प्लेटस, काटे, चमचे वापरावरील निर्बंध हटविले; परंतू उत्पादनांना सीआयपीईटी आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र केले आवश्यक

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार्‍या एकदाच वापराच्या (यूज ऍन्ड थ्रो) प्लेटस, ग्लासेस, काटे, कप, चमचे यासारख्या वस्तुंच्या वापरावरील निर्बंध राज्य शासनाने नुकतेच उठविले आहेत. परंतू हे निर्बंध उठवताना या वस्तु कंपोस्टेबेल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग ऍन्ड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) व केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे. यामुळे या वस्तुंचे उत्पादन करणार्‍या छोटया व्यावसायीकांपुढे अडचणी निर्माण येणार आहे. त्याचवेळी प्रमाणीकरणाप्रमाणेच वस्तुंचे उत्पादन होते किंवा नाही याची खातरजमा कशी करायची हा तांत्रिक प्रश्‍नही प्रशासनासमोर उभा राहील्याचे पाहायला मिळत आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य शासनाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने २०१८ मध्ये ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी केंद्र शासनाने देखिल प्लास्टिक बंदीबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार्‍या यूज ऍन्ड थ्रो प्लेटस, ग्लासेस, कंटेनर्स, कप, चमचे अशा दैनंदीन वापराच्या वस्तू वापरावर कडक निर्बंध लादले. एवढेच नव्हे तर केंद्र शासनाच्या आदेशानंतर विक्रेते आणि उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर या वस्तू जप्त करून दंडात्मक कारवाई देखिल केली आहे. अशातच नुकतेच राज्य शासनाने या बंदीतून यूज ऍन्ड थ्रो प्लेटस्, ग्लासेस, कंटेनर्स, कप, चमचे या सारख्या वस्तू वगळल्या आहेत. हा बदल करताना या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे ६ लाख जणांचा विचार करण्यात आल्याचेही कारण देण्यात आले आहे. (Pune PMC News)

 

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करणार्‍या पुणे महापालिकेपुढे नवीन आव्हान ठाकले आहे. प्रामुख्याने राज्य शासनाने दिलेल्या आदेशामध्ये या वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कंपोस्टेबल असावे तसेच या उत्पादनांचे सीआयपीईटी व केंद्रीय प्रदूषण मंडळांकडून प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही संस्थांच्या मान्यतांनंतर उत्पादीत होणार्‍या प्लास्टिकच्या या वस्तुंची खातरजमा करणे, बनावट वस्तु शोधायच्या कशा, यापुर्वी करण्यात आलेल्या कारवाईचे काय करायचे? असे अनेक प्रश्‍न प्रशासनापुढे उभे राहीले आहेत.

 

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेले सुधारीत आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची याचे अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकार्‍यांना विनंती करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

– आशा राउत Asha Raut PMC (उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका)

 

Web Title :- Pune PMC News | Removed restrictions on use and throw plastic plates, forks, spoons; But the products need to be certified by CIPET and Central Pollution Control Board

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; तरुणावर FIR, येरवडा परिसरातील घटना

Ajit Pawar | प्रकाश आंबेडकरांना ‘महाविकास’मध्ये घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

 

Related Posts