IMPIMP

Indian Air Force Recruitment | भारतीय वायुसेनेत अग्नीविरांची भरती जाहीर

by nagesh
Indian Air Force Recruitment | indian air force agniveer recruitment 2022 registrations begins from november know how to apply

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायुसेनेत (Indian Air Force Recruitment) अग्निपथ योजनेंतर्गत भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी 2023 च्या बॅचसाठी ही भरती होणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वयोगटातील तरुण या भरतीत (Indian Air Force Recruitment) सहभागी होऊ शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय वायुसेनेत भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 07 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. तर अर्जाची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर असणार आहे. सर्व अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अधिकृत सूचनेनुसार, अग्निवीरांसाठी ऑनलाइन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना वायुसेनेत काम करण्याची संधी दिली जाईल. यात तरुणांना चार वर्षे वायुदलात सेवेची संधी मिळणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना एक रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान ३० दिवसांची भरपगारी रजा देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय कारणासाठी देखील रजा घेता येणार आहे.

 

या नोकरीच्या अर्जासाठी 12 वी इयत्तेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयात किमान 50% गुण आवश्यक आहेत. तसेच इंजिनियरिंगचा तीन वर्षीय डिप्लोमाधारक विद्यार्थी देखील या भरती प्रक्रियेत अर्ज करु शकतात. फिजिक्स आणि मॅथ्ससह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज करण्याची संधी दिली गेली आहे. agnipathvayu.cdac.in या संकरेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अर्ज कसा करायचा?

– हवाई दलात अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in ला भेट द्या.

– होमपेजवर तुम्हाला Apply Online वर क्लिक करावे लागेल.

– उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल.

– साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.

– तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.

– शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करा.

– उमेदवारांना सांगितले जाते की अर्जाची फी 250 रुपये आहे आणि ती डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.

 

 

Web Title :- Indian Air Force Recruitment | indian air force agniveer recruitment 2022 registrations begins from november know how to apply

 

 

हे देखील वाचा :

Pune News | कात्रज येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’

Raj Thackeray | मनसे-भाजपा-शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर राज ठाकरे यांनीच दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

 

 

Related Posts