IMPIMP

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’

by nagesh
  Maharashtra Politics | balasahebanchi shivsena minister uday samant said we will welcome milind narvekar in shinde group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर मातोश्रीला अखेरचा जय महाराष्ट्र करणारे शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि पदाधिकारी यांची यादी मोठी आहे. यामध्ये मातोश्रीचे अतिशय निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणार्‍यांची सुद्धा काही नावे आहेत. असेच एक निष्ठावंत जे सतत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मागे सावलीसारखे मातोश्रीत वावरत होते ते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) सुद्धा शिंदे गटात (Shinde Group) जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता शिंदे गटाच्या मंत्र्याने एक वक्तव्य (Maharashtra Politics) केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला चार-पाच जण आहेत जे आम्हाला उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचू देत नाहीत, त्यांचे कान भरतात असा आरोप बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केला होता. यामध्ये एक नाव मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा होते. पण, आश्चर्य म्हणजे तेच मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात निघाल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राजकीय द्वेशातून शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांची सुरक्षा कमी करत असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत (Udaya Samant) यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

 

उदय सामंत यांनी म्हटले की, मिलिंद नार्वेकर यांच्या जीवावर जर कोणी उठले असेल किंवा कोणी वाईटावर असेल तर आम्ही सदैव मिलिंद नार्वेकर यांच्या पाठीशी उभे राहू. नार्वेकर यांना हवी ती सर्व मदत करायला आम्ही तयार आहोत. जर मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मिलिंद नार्वेकर हे एमसीएमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे मेरिट आणि क्रेडिट आहे, त्यांचे कौतुक केले पाहिजे. नार्वेकर यांच्यासारखी व्यक्ती जर मला सापडली असती तर मी रोज सकाळी-संध्याकाळी त्यांचे कौतुक केले असते. पण नार्वेकर यांचे कौतुक केल्यामुळे काही लोकांना भीती वाटते. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामंत यांनी पुढे म्हटले की, मिलिंद नार्वेकर एक व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहेत.
मिलिंद नार्वेकरांना आमची गरज भासली तर नक्कीच आम्ही सर्वजण नार्वेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
एक व्यक्ती म्हणून नार्वेकरांचे राजकारणापलीकडे सर्वांशी चांगले संबंध आहेत.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो त्यावेळी त्यांनीच माझी भेट उद्धव ठाकरे यांच्याशी करून दिली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यातही मिलिंद नार्वेकर यांचा मोठा वाटा आहे.
त्यामुळे नार्वेकर यांचे शिंदे गटासोबतच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | balasahebanchi shivsena minister uday samant said we will welcome milind narvekar in shinde group

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोथरुड परिसरातील टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 104 टोळ्यांविरुद्ध मोक्का

Raj Thackeray | मनसे-भाजपा-शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर राज ठाकरे यांनीच दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांच्या सासूचे निधन; किरीट सोमय्यांवर केला गंभीर आरोप

 

Related Posts