IMPIMP

Chinese goods in India | चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

by omkar
Boycott China

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –वृत्त संस्था – एकेकाळी हिंदी-चीनी भाई-भाईच्या घोषणा देशात दिल्या जात होत्या. याचाच फायदा घेत चीन (China) भारतात आपल्या वस्तू (Chinese goods in India) मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवत होता. परंतु मागील एक वर्षात बायकॉट चीन अभियानामुळे चीनकडून आयात सातत्याने कमी होत आहे. एका सर्वेमधून ही बाब समोर आली आहे. गलवान खोर्‍यात (Galvan Valley) झालेल्या चीन-भारत संघर्षानंतर (India-China border dispute) सामान्य भारतीयांचा मूड सुद्धा चीनी उत्पादनांच्या वापराबाबत बदलला का, यावर लोकल सर्कलने सर्वे केला आहे.
या सर्वेनुसार, 43 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी एका वर्षात चीनमध्ये तयार झालेली कोणतीही वस्तू खरेदी केलेली नाही.
तर ज्या लोकांनी वस्तू खरेदी केल्या, त्यापैकी 70 टक्केंचे म्हणणे होते की,
त्यांनी प्रॉडक्टच्या तुलनेत त्याची किंमत पाहून म्हणजे परवडणारे असल्याने खरेदी केले.

Governor appointed MLA | विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

यासाठी भारतीय खरेदी करत नाहीत चीनी वस्तू

लडाखच्या गलवान खोर्‍यात चीन भारताच्या सीमेत घुसला होता. यामुळे एक वर्षापूर्वी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 23 जवान शहीद तर अनेकजण जखमी झाले होते.
यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.यानंतर मोदी सरकारने चीनला अद्दल घडवण्यासाठी टिकटॉकसह चीनची अनेक लोकप्रिय अ‍ॅप्स बंद केली होती.
यावेळी देशात चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी सुद्धा जोर धरत होती.

चांगल्या क्वालिटीमुळे 38 टक्क्यांनी खरेदी केल्या चीनी वस्तू
40 टक्के लोकांनी वैशिष्ट्य आणि 38 टक्के लोकांनी चांगल्या क्वालिटीमुळे चीनी सामान खरेदी केले.
मात्र, चीनच्या वस्तू खरेदी करणार्‍या 60 टक्क्यांनी केवळ 1-2 आयटमच खरेदी केले.
केवळ 1 टक्के लोक असे होते ज्यांनी मागील एक वर्षात 20 पेक्षा जास्त चीनी आयटम खरेदी केले. अशाप्रकारे 15 ते 20 चायनीज आयटम खरेदी करणार्‍यांची संख्या सुद्धा इतकीच होती.

असा करण्यात आला सर्वे
281 जिल्ह्यांमध्ये राहणार्‍या लोकांच्या 18 हजार प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
प्रतिक्रिया देणार्‍यांमध्ये 33 टक्के महिला आणि 67 टक्के पुरुष होते.
44 टक्के लोक टियर एक, 31 टक्के टियर दोन आणि 25 टक्के टियर तीन,
चार आणि ग्रामीण भागातून होते.

Antilia Bomb Scare Case | अँटिलिया प्रकरणात NIA ने दोन जणांना केली अटक, लातूर कनेक्शन उघड

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

 

Related Posts