IMPIMP

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; न्यूट्रीलिशियस, इऑन वारियर्स संघांची विजयी आगेकूच!

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Nutrilicious, Eon Warriors Teams Win!!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   बालन ग्रुपतर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T 20 League
2022) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत न्यूट्रीलिशियस आणि इऑन वारियर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी आगेकूच
केली. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आकाश बोराडे याच्या कामगिरीच्या जोरावर इऑन वॉरियर्स संघाने सलग पाच सामने अपराजित राहिलेल्या एमईएस क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस क्रिकेट क्लबने १६५ धावांचे आव्हान उभे केले. सलामीवीर इर्शाद शेख (नाबाद ८६ धावा) आणि साईनाथ शिंदे (नाबाद ६४ धावा) या दोघांनी १६५ धावांची अभेद्य भागीदारी केली. इऑन वॉरियर्सने हे आव्हान १९.४ षटकांत व ५ गडी गमावून पूर्ण केले. आकाश बोराडे (४९ धावा), अभिमन्यू सिंग (४१ धावा), निनाद आर. (३९ धावा) आणि कौशिक चिळलीकर (२० धावा) यांनी महत्त्वपूर्ण धावांचे योगदान देत संघाचा सलग दुसरा विजय साकार केला.

 

 

अर्थव काळे याच्या नाबाद ११० धावांच्या जोरावर न्यूट्रीलिशियस संघाने पूना क्लब संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पूना क्लबने १५० धावा फलकावर लावल्या. सागर बिरदावाडे (५३ धावा) आणि ओंकार अखाडा (नाबाद ३३ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूट्रीलिशियसच्या अर्थव काळे याने ४९ चेंडूत ८ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद ११० धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. श्रेयस वालेकर याने ३६ धावांची खेळी केली. न्यूट्रीलिशियसने हे आव्हान १२.५ षटकांत सहज पूर्ण केले. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी
एमईएस क्रिकेट क्लब : २० षटकांत बिनबाद १६५ धावा (इर्शाद शेख नाबाद ८६ (६८, ९ चौकार, ३ षटकार), साईनाथ शिंदे नाबाद ६४ (५२, ८ चौकार, १ षटकार) पराभूत वि. इऑन वॉरियर्स : १९.४ षटकांत ५ गडी बाद १६६ धावा (आकाश बोराडे ४९, अभिमन्यू सिंग ४१, निनाद आर. ३९, कौशिक चिळलीकर २०); सामनावीर : आकाश बोराडे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पूना क्लब : २० षटकांत ६ गडी बाद १५० धावा (सागर बिरदावाडे ५३ (३६, ६ चौकार, २ षटकार),
ओंकार अखाडा नाबाद ३३, अजिंक्य नाईक २०, आदित्य लोंढे ३-२१, नवीन कटारिया २-३८)
पराभूत वि. न्यूट्रीलिशियस : १२.५ षटकांत बिनबाद १५२ धावा (अर्थव काळे नाबाद ११० (४९, ८ चौकार, १० षटकार),
श्रेयस वालेकर ३६); सामनावीर : अर्थव काळे.

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Nutrilicious, Eon Warriors Teams Win!!

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जास्त परताव्याचे आमिष दाखवून कॉलेजमधील मित्रानेच घातला 10 लाखांचा गंडा; पुण्यातील प्रकार

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

 

Related Posts