IMPIMP

Instant Personal Loan | विना गॅरंटी ताबडतोब मिळेल 20 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

by nagesh
SBI Interest Rate | sbi interest rate hike 25bps from 15 december loan intrest rate increase

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाInstant Personal Loan | स्टेट बँक ऑफ इंडिया (State bank of India) कडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाऊंट (Salary Account) उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेतून सॅलरी अकाऊंट उघडणार्‍या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. याबाबत सविस्तर माहिती घेवूयात. (Instant Personal Loan)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर सूट देते. याशिवाय अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.

 

20 लाखांपर्यंत मिळेल कर्ज
ग्राहक गरजेनुसार बँकेच्या वैयक्तिक कर्जाचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (टर्म लोन) त्वरित उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना किमान कागदपत्रे देणे आवश्यक आहे. पगारदार ग्राहकांसाठी डिझाईन केलेल्या या वैयक्तिक कर्जासाठी कोणत्याही सुरक्षा किंवा हमीची आवश्यकता नाही. (Instant Personal Loan)

 

कोणाला मिळतो कर्जाचा लाभ

– वैयक्तिक कर्जासाठी, ग्राहकाचे कोणत्याही शाखेत पगार खाते असणे आवश्यक आहे.

– किमान निव्वळ मासिक वेतन 15,000 रुपये असावे.

– कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्र, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थेची कर्मचारी असावी.

– अर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असावे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जाणून घ्या व्याजदर
या कर्जाचा व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होऊन 11.10 टक्के प्रतिवर्ष असेल. यामध्ये ग्राहकांना कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

 

ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेत ग्राहकांना 2 महिन्यांचा पगार आगाऊ मिळतो.

 

Web Title :- Instant Personal Loan | sbi customers get instant personal loan of rs 20 lakh without guarantee

 

हे देखील वाचा :

Benefits Of Tomato Bleach | 1 ‘टोमॅटो’ चेहऱ्याचा रंग बदलेल, एका महिन्यात चेहरा चमकेल; डागही नाहीसे होतील

UP Assembly Election 2022 | यूपीच्या राजकारणात भाजपला धक्के ! कॅबिनेट मंत्र्यांसह आमदारांचे राजीनामे; अखिलेश यादव म्हणाले…

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.22 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे

 

Related Posts