IMPIMP

Jayant Patil | अमोल मिटकरींनी केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून सारवासारव; जयंत पाटील म्हणाले…

by nagesh
Jayant Patil | suspension of ncp leader jayant patil till the end of winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनJayant Patil | राज्यात आधीच अनेक विषयांवरून राजकारण तापलेलं असताना त्यात आणखी एक भर पडली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगलीमधील (Sangli) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादी यावर सारवासारव करताना दिसत आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपली प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरींचं ते वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या (Wedding Ceremony) मंत्राचा उल्लेख त्यांनी केला त्यावेळी मी माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान असून ती मतं त्यांची असतील पक्षाची नाही, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

 

ब्राह्मण समाजाला (Brahmin Society) दुखावण्याचा हेतू त्या सभेचा नव्हता मिटकरींच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटत आहे.
त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही.
पण मंत्रपठण (Mantra Recitation) वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे.
मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, आमची कोणाचीही टोकाची भूमिका नसून माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे, असं पाटील म्हणाले.
मात्र दुसरीकडे पुण्यात (Pune) ब्राह्मण महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर (Nationalist Congress Office Pune) आंदोलन केलं. मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर मिटकरी हे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याने आता पुढे काय होतं ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Jayant Patil | MLA amol mitkari vs brahmins issue what ncp mal said while talking about hindu rituals

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील नऱ्हे येथील व्यसनमुक्ती केंद्रात एकाचा काचेने गळा कापून खून

Rohit Pawar | ‘काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल पण…’; पवारांचा भाजप, मनसेवर निशाणा

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून मेफेड्रोन (MD) जप्त, गुन्हे शाखेची खराडी परिसरात कारवाई

 

Related Posts