IMPIMP

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

by nagesh
Jayant Patil On Jitendra Awhad | 'NCP agrees with Jitendra Awad's position' - state president Jayant Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Jayant Patil On Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आणि चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँगेस सहमत असल्याचे जयंत पाटील (Jayant Patil On Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुळात असे चित्रपट निर्माण करणाऱ्यांवर रोक लावली पाहिजे. सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारने हा खोटा इतिहास दाखवू नका, असे सांगितले पाहिजे. पण सरकार तसे काही न करता, तो चित्रपट कसा दाखविता येईल, याकडे लक्ष पुरवत आहे. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा वेडा वाकडा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला. या चित्रपटातून शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची बदनामी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्याविरोधात आमचा हा लढा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण भक्कमपणे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी उभी आहे. सरकारने या चित्रपटाला प्रश्न केला पाहिजे. पण ते तसे न करता, विरोध करणाऱ्यांना अटक करत आहेत. त्यामुळे सरकार या चित्रपटाच्या समर्थनात आहे, असा अर्थ त्यातून निघत असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले. (Jayant Patil On Jitendra Awhad)

हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करुन चित्रपट तयार केल्याचा आरोप काही संघटना आणि इतिहास
अभ्यासकांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) आवाज उठविला होता. ठाण्यातील एका मॉलमध्ये
या चित्रपटाचा प्रयोग सुरु असताना, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपट बंद पाडला आणि
प्रेक्षकांना मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात
(Vartak Nagar Police Station) गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार आज (दि. 11) जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Web Title :- Jayant Patil On Jitendra Awhad | ‘NCP agrees with Jitendra Awad’s position’ – state president Jayant Patil

हे देखील वाचा :

Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

Narendra Modi Stadium | काँग्रेस नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव बदलणार; निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन

Related Posts