IMPIMP

Johnson And Johnson Baby Powder | ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ प्रकरणात हायकोर्टाचा ‘एफडीए’ला दणका; कंपनीला बेबी पावडर विक्रीस परवानगी

by nagesh
 Johnson And Johnson Baby Powder | Mumbai high court relief to johnson and johnson permission to sell baby powder

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – अमेरिकी कंपनी असलेली जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी बेबी पावडरच्या उत्पादनात अडचणीत सापडली होती (Johnson And Johnson Baby Powder). या कंपनीच्या बेबी पावडरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे कँसर होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जगभरातून कंपनीविरोधात केस दाखल करण्यात आल्या होत्या. पण त्यातच मुंबई हायकोर्टाने या कंपनीस मोठा दिलासा दिला असून या कंपनीच्या पावडर विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. (Johnson And Johnson Baby Powder)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लहान मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या बेबी पावडरवर एफडीए कडून बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यात एफडीए चा बंदीचा आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला. हा आदेश रद्द करतानाच कोर्टाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला काही अटी घातल्या आहेत. तपासणी झालेल्या संचातील सर्व माल कंपनीने नष्ट करावा आणि एफडीए कडून आक्षेप घेण्यात आलेल्या पावडरचा एकही डबा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने कंपनीला दिले आहेत. कोर्टाच्या या सर्व अटी कंपनीने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता जॉन्सनच्या बेबी पावडर विक्रीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. (Johnson And Johnson Baby Powder)

 

मागच्या वर्षी ‘नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राइट्स’ने (NCPCR) डीसीजीआय आणि सीडीएससीओ (CDSCO) या दोन्ही संस्थांना समन्स पाठवले होते. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी शॅम्पू आणि टाल्कम पावडरमध्ये फॉर्माल्डिहाइड (Formaldehyde) आणि अ‍ॅस्बेस्टोस (मानवांमध्ये कॅन्सर तयार होण्यासाठी कारणीभूत मानले जाणारे घटक) या घटकांची उपस्थिती तपासण्यासाठीच्या चाचणी पद्धतीत एकसमानता का नाही, याबाबत या दोन्ही संस्थांनी हजर राहून स्पष्टीकरण देण्यास सांगितले गेले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२०१३ साली महाराष्ट्र ड्रग रेग्युलेटरने या कंपनीचं लायसन्स रद्द केलं होतं.
कंपनीच्या पावडर बनवणाऱ्या एका कारखान्यात इथिलिन ऑक्साइडचा वापर
(कॅन्सरला कारणीभूत ठरणारे केमिकल) करण्यात येत असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर २०१८ मध्ये इंडियन ड्रग रेग्युलेटरने सदोष हिप इम्प्लांट विकल्याबद्दल रुग्णांना भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते.
२०१९ च्या फेब्रुवारीमध्ये जॉन्सन (Johnson Baby Powder) बेबी शाम्पूच्या नमुन्यांची चाचणी केली असता,
त्यात फॉर्माल्डिहाइड हा घटक आढळून आला; मात्र नंतर गुजरातच्या नियामक संस्थेने या उत्पादनाला हिरवा कंदील दाखवला होता.

 

गेल्या वर्षी देखील जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या पाच सन्स्क्रीनचे लॉट बाजारातून परत बोलावले होते.
या सन्स्क्रीनमध्ये बेंझीनची मात्रा आढळली होती. बेंझीनच्या संपर्कात आल्याने त्वचेचा कँसर होऊ शकतो.
यामुळे कंपनीकडून स्वतः ही उत्पादने परत मागविण्यात आली होती. अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

 

Web Title :- Johnson And Johnson Baby Powder | Mumbai high court relief to johnson and johnson permission to sell baby powder

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘पटोलेंचा दावा म्हणजे उंटावरून…’; भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका

Pune Crime News | यात्रेत गावगुंडांचा हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना

Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

 

Related Posts