IMPIMP

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! कल्याण इलेव्हन, स्पाटर्न्स क्रिकेट क्लब संघांचे सलग विजय

by nagesh
Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First 'Joshi Sports Karandak' Premier League T20 Cricket Tournament! Consecutive wins for Kalyan XI, Spartans Cricket Club teams

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स
करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन आणि स्पाटर्न्स क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून
स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णा भट याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पाटर्न्स क्रिकेट क्लबने आयडीआज्-अ-सास संघाचा १३५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पाटर्न्स क्रिकेट क्लबने २०३ धावांचा डोंगर उभा केला. विवेक कुबेर याने ७० धावांची खेळी केली. प्रतिक जावेकर (२८ धावा), गौरांग गोवांडे (२७ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२७ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आयडीआज्-अ-सास संघाचा डाव ६८ धावांवर गडगडला. कृष्णा भट याने १५ धावात ५ गडी बाद करून आयडीआज् संघाच्या डावाल खिंडार पाडले आणि सामन्यात महत्वपूर्ण कामगिरी केली.

 

ऋत्विक महाजन याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कल्याण इलेव्हन संघाने ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबचा ३ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना उत्कर्ष चौधरी याच्या नाबाद ७६ धावा आणि मोहम्मद ताहीर (३० धावा) यांच्या फलंदाजीमुळे ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १५९ धावा धावफलकावर लावल्या. कल्याण इलेव्हन संघाच्या ऋत्विक महाजन याने ५८ धावांची आणि चिराग शेरकर याने ४६ धावांची खेळी केली. यामुळे संघाने हे आव्हान ३ गडी राखून पूर्ण केले.

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पाटर्न्स क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद २०३ धावा (विवेक कुबेर ७० (४१, ११ चौकार, २ षटकार),
प्रतिक जावेकर २८, गौरांग गोवांडे २७, नचिकेत कुलकर्णी २७, नृपाल सवे २-३६)
वि.वि. आयडीआज्-अ-सासः १२.४ षटकात १० गडी बाद ६८ धावा
(तुशार महामुनी नाबाद १०, अवांतर धावा २०, कृष्णा भट ५-१५, रिषी २-१४); सामनावीरः कृष्णा भट;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी १५९ धावा (उत्कर्ष चौधरी नाबाद ७६ (५३, ६ चौकार, ३ षटकार), मोहम्मद ताहीर ३०, रोहीत ठाकूर १-१८) पराभूत वि. कल्याण इलेव्हनः १९.४ षटकात ७ गडी बाद १६१ धावा (ऋत्विक महाजन ५८ (३९, १० चौकार, १ षटकार), चिराग शेरकर ४६, मोहम्मद ताहीर २-१७); सामनावीरः ऋत्विक महाजन.

 

 

Web Title :- Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament! Consecutive wins for Kalyan XI, Spartans Cricket Club teams

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, पण अजित पवारांनी कधीच विश्वासघात केला नाही’

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

 

Related Posts