IMPIMP

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय

by nagesh
 S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament! MES Cricket Club team's second win in a row

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- S. Balan Cup T20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने ऑल मॉन्स्टर्स संघाचा डीएलएस मेथडनुसार एक धावेने पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दिपक डांगी याच्या भेदक गोलंदाजीमुळे एमईएस क्रिकेट क्लब संघाने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस क्रिकेट क्लबने १६५ धावा धावफलकावर लावल्या. अदवय सिधये (३२ धावा), वरूण गुजर (३३ धावा), अजय बोरूडे (२८ धावा) आणि करण जाधव (२३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. (S. Balan Cup T20 League)

 

ऑल मॉन्स्टर्स संघाने धावांचा पाठलाग सुरू केला. साई चव्हाण (नाबाद २९ धावा) आणि गौरीष जाधव (नाबाद २५ धावा) यांनी संघाचा डाव सावरत संघाला १२ षटकात ९३ धावा जमवून दिल्या होत्या. पण या दरम्यान पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी डीएलएस मेथडनुसार १२ षटकामध्ये ९४ धावा आवश्यक होत्या. पावसामुळे पुढे खेळ होणार नसल्याचे पंचांनी घोषित केले व एमईएस संघाने १ धावेनी सामन्यात विजय मिळवला. दिपक डांगी याने २५ धावात ३ गडी बाद करून संघाच्या विजयात चमकदार कामगिरी केली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एमईएस क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १६५ धावा (अदवय सिधये ३२, वरूण गुजर ३३, अजय बोरूडे २८, करण जाधव २३, यश गादीया ३-२४, आशय दुबे ३-२१) वि.वि. ऑल मॉन्स्टर्सः १२ षटकात ४ गडी बाद ९३ धावा (साई चव्हाण नाबाद २९, गौरीष जाधव नाबाद २५, दिपक डांगी ३-२५); सामनावीरः दिपक डांगी;

 

 

Web Title :-  S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament! MES Cricket Club team’s second win in a row

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, पण अजित पवारांनी कधीच विश्वासघात केला नाही’

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक

 

Related Posts