IMPIMP

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, पण अजित पवारांनी कधीच विश्वासघात केला नाही’

by nagesh
Maharashtra Politics News | bjp chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद
झालेत, त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे भाजप (BJP) त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही, त्यांच्यासाठी भाजपची दारं बंद झाली आहेत, असं भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटले. मात्र, अजित पवारांनी (Ajit Pawar) कधीही विश्वासघात केला नाही,
त्यांच्यासोबत मतभेद आहे, पण मनभेद कधीच (Maharashtra Politics News) झालेला नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते एका
वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, राऊतांनी सकाळची वैयक्तिक टिकाटिप्पणी बंद करावी, वैयक्तिक आरोप करु नये, तुम्ही विकासावर बोला, त्यावर आपण चर्चा करु असं आवाहन त्यांनी केलं. अजित पवारांनी एकदोनदा विकासावर (Maharashtra Politics News) भाष्य केलं, पण इतर विरोधकांनी नेहमीच वैयक्तिक टीका केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 

आगामी निवडणुकीबाबत भाष्य करताना बावनकुळे यांनी सांगितले की, विधानसभेच्या (Assembly Election)
200 आणि लोकसभेच्या (Lok Sabha Election) 48 जागा जिंकण्याचं भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं
(Shivsena Shinde Group) टार्गेट आहे. राज्यात भाजपचे 124 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील.
ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना शंभर टक्के भाजप मदत करेल,
असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | bjp chandrashekhar bawankule on shivsena uddhav thackeray sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलाचा विनयभंग

Pune Crime News | दुप्पट पैसे दिल्यानंतरही ३ रुम आणि २ लाखांची मागणी करणार्‍या सराईत गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक

Pune Crime News | माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, ३० लाखाच्या खंडणीची मागणी

 

Related Posts