IMPIMP

Kangana Ranaut | So Hot ! म्हणत कंगना रानौतनं शेअर केला नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘आइटम गर्ल’च्या वेशातील फोटो..

by nagesh
Kangana Ranaut | kangana ranaut shared nawazuddin siddiquis photo in lady look from the set of tiku weds sheru

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमध्ये कंगना रानौतला (Kangana Ranaut) आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. कंगना सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेकदा ती ट्विटरवर आपलं मत ठाम मांडत असते आणि त्यामुळे तिला मोठ्या वादालाही सामोरे जावं लागतं. तसेच सोशल मीडियावर ती (Kangana Ranaut) सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या विविध फोटो आणि व्हिडिओनं ती चाहत्यांना आकर्षित करून घेते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कंगना (Kangana Ranaut) चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणतीही संधी गमावत नाही. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर आगामी चित्रपटांमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा (Nawazuddin Siddiqui) एक गमतीदार लूकमधील फोटो शेअर केला आहे. त्या शेअर केलेल्या फोटोमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी ‘आयटम गर्ल‘च्या वेशात दिसत आहे. त्याचा हा लूक आगामी चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू (Tikuu Weds Sheru)’ मधील आहे. त्याचा हा लूक कंगनानं आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाकला आहे. या लूकमध्ये तो अगदी वेगळा दिसत असून, त्याने स्त्रीचा वेष धारण केला आहे. तसेच फोटोमध्ये त्याने एक गोल्डन रंगाचा सुंदर असा गाऊन परिधान केला आहे.

 

 

कंगनानं नवाजुद्दीनचा हा फोटो स्टोरीला शेअर करून, त्यावर ‘सो हॉट’ असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये लिहिलं की, ‘बिजली गिराने मे हू आई.’ तसेच मागील वर्षी कंगनानं आगामी चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू’ ची घोषणा केली होती. तसेच सध्या या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. विशेष म्हणजे तिनं शेअऱ केलेल्या या दोन्ही फोटोमध्ये नवाजुद्दीनला सुद्धा टॅग केलंय.

 

https://www.instagram.com/p/CZay35JPEsk/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत अवनीत कौर सुद्धा दिसणार आहे.
या चित्रपटांमध्ये कंगना इरफान खानला घेऊ इच्छित होती.
मात्र त्याच्या निधनानंतर नवाजुद्दीन आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे.
कंगनाचा हा पहिलाच डिजिटल चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kangana Ranaut | kangana ranaut shared nawazuddin siddiquis photo in lady look from the set of tiku weds sheru

 

हे देखील वाचा :

Baldness | टक्कल पडण्याची समस्या का होते? जाणून घ्या याची कारणे आणि बचावाच्या पद्धती

Maharashtra Police | सराफ व्यापाऱ्यावर पोलीस कोठडीत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, सहायक पोलीस निरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांचे निलंबन; पोलीस दलात प्रचंड खळबळ

Hypertension | ‘या’ 7 पद्धतीने ‘हाय ब्लड प्रेशर’चा धोका कमी करू शकतो जास्वंदीच्या फुलाचा चहा !

 

Related Posts