IMPIMP

Kidney Stone Diet | किडनी स्टोनच्या रूग्णांनी खा ‘ही’ फळे, लवकरच पडेल किडनीतील स्टोन…

by sachinsitapure
Kidney Stone Diet

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – सध्या मुतखडा हा एक अतिशय सामान्य आजार आहे (Kidney Stone Diet). अनेक रूग्णांना या आजाराचा सामाना करावा लागत आहेत (Kidney Stone Patient). मुतखडा होण्याचं मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि अवेळी खाण्याच्या सवयी होय. ज्या पदार्थांमध्ये ऑक्सालेटचे प्रमाण जास्त असते, ते पदार्थ शक्यतो मुतखडा असणाऱ्यांनी टाळावे. काही पदार्थांचे सेवन करून तुम्ही किडनी स्टोन (Kidney Stone) घालवू शकता. आहारामध्ये काही फळांचे सेवन केले, तर मुतखड्याचा त्रास नाहिसा होऊ शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत ते फळ (Kidney Stone Diet)

१) पाणी असणारी फळे –

नारळ पाणी, टरबूज, खरबूज इत्यादी फळे पाण्याचे असतात. ही फळे खाणे मुतखड्यासाठी चांगलं असतं. पाणी असणारे पदार्थ खडा वितळविण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या आहारात जास्तीत जास्त पाणीयुक्त फळांचा समावेश करावा. तसेच रोज पाणी सुद्धा जास्त प्रमाणात प्या.

२) आंबट फळे खा –

लिंबू, संत्री या फळांमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोटातील खडा वितळण्याची शक्यता असते. लिंबू, संत्री सारख्या फळांमध्ये आणि त्यांचा रसामध्ये सायट्रिक ऍसिड (Citric acid) असते. त्यामुळे त्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे (Fruits For Kidney Stone).

३) कॅल्शियम युक्त गोष्टींचा आहारात समावेश करा-

तुम्हालाही किडनी स्टोनची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काळी द्राक्षे, अंजीर यांचा समावेश करू शकता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts