IMPIMP

Kirit Somaiya | ‘नवाब मलिकानंतर आता ‘या’ नेत्याचा नंबर’; मलिकांच्या अटकेनंतर सोमय्या पुन्हा गरजले!

by nagesh
Kirit Somaiya | BJP Leader On Thackeray Government Minister Nawab Malik Arrest ED

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनKirit Somaiya | राज्याच्या मंंत्रिमंडळातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक
केली आहे (ED Arrest Minister Nawab Malik). मलिकांच्या अटकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना
अटक झाल्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार (Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया देताना राज्य सरकारमधील शिवसेना (Shiv Sena) पक्षावर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ठाकरे सरकारने (Thackeray Government) कितीही दादागिरी केली तरी त्यांच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहोत. अनिल देशमुखांनंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर हा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

नवाब मलिक यांना आता कोर्टात नेलं असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते भाजपवर (BJP) निशाणा साधताना दिसत आहेत.
अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

 

दरम्यान, हा आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस (Notice) न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे.
हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याचं जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP Leader On Thackeray Government Minister Nawab Malik Arrest ED

 

हे देखील वाचा :

Shilpa Shetty Fitness Video | शिल्पा शेट्टीनं व्हिडिओ शेअर करून महिलांना मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी दिल्या खास टिप्स, कॅप्शनमध्ये लिहिला मौल्यवान संदेश

Central Railway Recruitment 2022 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदांसाठी होतेय भरती, जाणून अर्ज करण्याची पद्धत

Pune Crime | पुण्यात भेसळयुक्त ताडीची विक्री करणारा गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 57 जणांवर कारवाई

 

Related Posts