IMPIMP

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

by nagesh
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Laal Singh Chaddha | लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर काही लोकांनी द्वेषातून बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. यामुळे अभिनेता आमिर खानचा चित्रपट सुरूवातीपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. बहिष्कारामुळे प्रदर्शनानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, ऑस्कर अकादमीने या चित्रपटासाठी ट्विट केल्याने हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे. (Laal Singh Chaddha)

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे कौतुक होताना दिसत आहे. ऑस्कर अकादमीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑस्करचे 6 पुरस्कार मिळालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातील काही दृश्य दिसत आहेत. (Laal Singh Chaddha)

अकादमीच्या ट्विटनंतर हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरणार असल्याच्या चर्चा सुरू असली तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही. अकादमीने शेअर केलेल्या या व्हिडीओतून दोन्ही चित्रपटातील समानता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑस्कर अकादमीने लिहिले आहे की, रॉबर्ट गेमेकिस आणि एरिक रॉथ यांच्या कथेने जग बदलून टाकले होते. आता अद्वैत चंदन आणि अतुल कुलकर्णी यांनी यावर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. फॉरेस्ट गम्पमध्ये टॉम हँक्सने साकारलेली भूमिका ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये आमिर खानने साकारली आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ ने 13 पैकी 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता.

‘लाल सिंग चड्ढा’ 11 ऑगस्टला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
बायकॉटचा चित्रपटाला फटका बसला आहे. त्यामुळे चित्रपटाने आतापर्यंत फारशी कमाई केलेली नाही.
चित्रपटात आमिर खान सोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

Web Title : –  Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :

Related Posts