IMPIMP

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकरांना बरं होण्यासाठी वेळ लागेल, डॉक्टरांनी सांगितलं

by nagesh
Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar is critical She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांना काही दिवसांपूर्वी कोरोना (Corona) आणि न्यूमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी आणि त्या लवकरात लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशभरातून लोक प्रार्थना करत आहेत. आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृती विषयी महत्वाची माहीती दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लता मंगेशकर या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत आणि आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. वय अधिक असल्याने त्यांना रिकव्हर (Recover) होण्यास वेळ लागेल, अशी माहिती लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी दिली आहे. लतादीदी या लवकर ठिक होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

 

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची (Ventilator Support) गरज नाही. त्या रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. वॉर्डमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.

 

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar health update she is still in the icu ward

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या 37 वर्षीय महिलेचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण

Gold Silver Price Today | सोन्याचा भाव ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बदल; जाणून घ्या किती येईल पगार

 

Related Posts