IMPIMP

Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

by nagesh
Pune Nashik Highway Accident | Terrible accident on Pune-Nashik route, 10 sheep killed on the spot

लातूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Latur Accident News | मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला तर एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. ही दुर्दैवी घटना निलंगा ते औराद महामार्गावर (Nilanga to Aurad highway) अनसरवाडा पाटीजवळ घडली. भरधाव वेगात जाणारी इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Latur Accident News) झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा कार (Innova Car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली.
हा अपघात इतका भीषण होता की कारने चारवेळा पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघातातील लोक हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीच्या सोयरीकीच्या कामासाठी औरादकडे जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

या अपघातात भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे,
राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी
झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जात असताना वाटेतच काळाने घाला घातला.

 

 

Web Title :- Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured

 

हे देखील वाचा :

Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | येत्या 15 दिवसात जात प्रमाणपत्रासंदर्भात बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

Pune Daund News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रासायनिक औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार

 

Related Posts