IMPIMP

LIC Unclaimed Money | एलआयसीकडे बेवारस पडून आहेत 20,000 कोटी रुपये, कोणीही नाही दावेदार; इतक्या पैशात तर टाटा ग्रुपच्या ‘या’ पाच कंपन्या उभ्या राहिल्या असत्या

by nagesh
LIC Unclaimed Money | lic have 20000 crores of unclaimed money this amount is more than the market cap of 5 companies of tata group

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Unclaimed Money | भारतीय आयुर्विमा महामंडळ Life Insurance Corporation Of India (LIC) कडे 20,000 कोटी रुपये बेवारस पडून आहेत, ज्याचे कोणीही दावेदार नाहीत. या बेवारस पैशाची किंमत अनेक मोठ्या कंपन्यांच्या किंमतीएवढी आहे. खरं तर, एलआयसीने SEBI ला सादर केलेल्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग Initial Public Offering (IPO) च्या तपशिलानुसार, देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीकडे 21,539.5 कोटी रुपयांची रक्कम (LIC IPO) आहे, ज्याचे कोणीही दावेदार नाहीत. एलआयसीचा आयपीओ पुढील महिन्यात लाँच होत आहे आणि हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असू शकतो. (LIC Unclaimed Money)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पॉलिसी मॅच्युरिटीनंतर मिळाली नाही रक्कम
बिझनेस स्टँडर्डमधील एका रिपोर्टनुसार, या बेवारस रकमेमध्ये सेटल केलेल्या त्या दाव्यांचा सुद्धा समावेश आहे, ज्यांचे पैसे दिले गेले नाहीत.
ही रक्कम ती आहे जी पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर थकीत ठरली आहे.
यामध्ये अतिरिक्त देय रक्कम देखील समाविष्ट आहे जी परत केली जाणार आहे.

 

सर्वात मोठी देय रक्कम पॉलिसीच्या मॅच्युरिटीमुळे आहे.
परंतु पैसे गुंतवणूकदारापर्यंत पोहोचले नाहीत. ही रक्कम 19,285.6 कोटी रुपये किंवा एकूण दावा न केलेल्या रकमेच्या सुमारे 90 टक्के आहे.
मार्च 2021 पासून सहा महिन्यांत एकूण दावा न केलेल्या रकमेत 16.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (LIC Unclaimed Money)

 

5 कंपन्यांचे मार्केट कॅपही दिसले कमी
ही रक्कम मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त आहे. एलआयसीकडे एवढी बेहिशेबी रक्कम पडून आहे की, टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांची मूल्येही कमी आहेत.

 

बीएसईवर सूचीबद्ध टाटा समूहाच्या पाच कंपन्या – टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्केट कॅप (रु. 7,163.79 कोटी), टाटा कॉफी लिमिटेड मार्केट कॅप (रु. 3,726.07 कोटी), टाटा मेटालिक्स लिमिटेड मार्केट कॅप (रु. 2,461.31 कोटी), टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स लि. मार्केट कॅप (3,168.28,) आणि नेल्कोचे मार्केट कॅप (रु. 1,589.42 कोटी) आहे. जरी हे सर्व एकत्र केले तरीही, ही रक्कम अजूनही एलआयसीकडे पडलेल्या 20,000 कोटी रुपयांच्या रकमेपेक्षा कमीच आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित
गेल्या सहा महिन्यांत 4,346.5 कोटी दावा न केलेली रक्कम म्हणून हस्तांतरित करण्यात आली आहे.
या कालावधीत एकूण 1,527.6 कोटी रुपये दावा म्हणून अदा करण्यात आले आहेत.
मात्र, मोठ्या प्रमाणात दावे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, दावा न केलेल्या थकबाकीपैकी अर्धी रक्कम तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी प्रलंबित आहे.

 

सरकारने अधिसूचित केले आहे की सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्या अशा संस्थांमध्ये असतील ज्यांना वित्त कायदा 2015 आणि वित्त कायदा 2016 चे पालन करून दावा न केलेले पैसे SCWF कडे हस्तांतरित करावे लागतील,
असे सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

 

एलआयसी शिवाय, बँकांकडे सुद्धा 24,356 कोटी रुपये दावा न करण्यात आल्याने पडून आहेत.
त्याच वेळी, शेअर बाजारात 19,686 कोटी रुपये दावा न केलेली रक्कम आहे.
सरकार एलआयसीच्या आयपीओमधून पाच टक्के हिस्सा विकणार आहे.
सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट Department Of Investment And Public Asset Management (DIPAM) च्या निवेदनानुसार, त्यांच्याकडे 283 मिलियन पॉलिसी आणि 1 मिलियनपेक्षा जास्त एजंट आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- LIC Unclaimed Money | lic have 20000 crores of unclaimed money this amount is more than the market cap of 5 companies of tata group

 

हे देखील वाचा :

Kevin Pietersen PAN Card | काय सांगता ! पॅन कार्ड हरवल्यावर ‘या’ विदेशी खेळाडूने मागितली थेट PM मोदींकडे मदत

Multibagger Penny Stocks | ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, एका वर्षात दिला 1900 टक्के रिटर्न

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! दररोज 167 रुपयाची करा गुंतवणूक अन् मिळवा 41 लाख, जाणून घ्या

 

Related Posts