IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! दररोज 167 रुपयाची करा गुंतवणूक अन् मिळवा 41 लाख, जाणून घ्या

by nagesh
Post Office Scheme | post office scheme 167 rupees investment on daily basis makes 41 lakh fund by ppf scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | भारतातील सर्वात मोठा आणि सुरक्षित मार्ग म्हणून भारतीय पोस्ट ऑफिस कडे (Post Office Scheme) बघितले जातेय. अनेक सर्वसामान्यांसाठी पोस्ट ऑफिसची योजना अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित राहते. त्यामुळे पोस्ट ऑफिसवर अनेकांचा विश्वास आहे. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंडही (PPF) हीच योजना आहे. या योजनेत गुंतवणूक (Investment) करून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी लाखो रुपयांचा निधी बनवू शकणार आहात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डेली 167 रुपयांची गुंतवणूक करा –
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे संपूर्ण सुरक्षित राहतील आणि तुमचे पैसे करमुक्त असतात. 16 लाख रुपयांच्या मॅच्युरिटीसाठी, तुम्हाला रोज 167 रुपये अर्थात 5 हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे. तुमच्या PPF खात्यामध्ये प्रति महिना 5 हजार रुपये जमा केल्यास 15 वर्षांच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 16 लाख रुपयांपेक्षा अधिक मिळू शकणार आहे. (Post Office Scheme)

 

PPF खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो. जर तुम्हाला तो 15 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, तुम्ही PPF खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये नवीन योगदानासह सुरू ठेवू शकता. येथे आम्ही तुम्हाला 25 वर्षांची गणना सांगत आहोत. यासाठी तुम्हाला 2 वेळा 5-5 वर्षांचे ब्लॉक खाते कॅरी फॉरवर्ड करावे लागणार आहे.

 

दरम्यान, समजा तुम्ही 16 व्या वर्षापासून 25 व्या वर्षापर्यंत प्रतिमहिना 5 हजार रुपयांचे (प्रतिदिन 167 रुपये) योगदान (Contribution) चालू ठेवले तर 25 व्या वर्षाच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 41 लाखांची रक्कम मिळणार आहे. हमी परताव्यासह या योजनेमध्ये, गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा मस्त लाभ मिळू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असे मिळणार 41 लाख –
पोस्ट ऑफिसची PPF योजना ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी जबरदस्त स्कीम आहे.
PPF मध्ये प्रतिमहिना 5 हजार रुपये गुंतवले, तर तुम्ही वार्षिक 60 हजार रुपये गुंतवले आहेत.
5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये खाते वाढवल्यास, ते 25 वर्षांत मॅच्योर झाल्यानंतर तुम्हाला 41.23 लाख रुपये मिळतील.
यात तुमची 15 लाख रुपयांची गुंतवणूक असणार आहे, तर 26.23 लाख रुपयांची संपत्ती वाढणार आहे.

 

तिमाही आधारावर व्याजदर बदलते –
PPF वर सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळत आहे. तुम्हाला 41 लाखांचा निधी तयार करणे सोपे जाईल.
PPF मध्ये चक्रवाढ वार्षिक आधारावर केली जातेय.
पीपीएफ खात्यामध्ये सरकार दर तिमाही आधारावर व्याजदर बदलते.
पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. पण, खातेदार 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये मुदतवाढीसाठी अर्ज करू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

करमुक्त असतो निधी –
PPF मध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहेत.
यात योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते.
PPF मध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कमही करमुक्त आहे.
दरम्यान, असे PPF मधील गुंतवणूक EEE श्रेणीत येते. पीपीएफ खात्यावर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.
पीपीएफ खाते ज्या वर्षात उघडले आहे, त्या वर्षाच्या अखेरीस 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कोणीही कर्जासाठी अर्ज करू शकणार आहात.

 

Web Title :- Post Office Scheme | post office scheme 167 rupees investment on daily basis makes 41 lakh fund by ppf scheme

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 6.25 कोटींची फसवणूक, महिलेसह दोघांवर FIR; एकाला अटक

PMRDA Drive-Illegal Structures | पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईला महिलांचा विरोध, महिलांचा इमारतीवर ठिय्या; पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी

Dombivli Crime | धक्कादायक ! घरातील सोफासेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात प्रचंड खळबळ

 

Related Posts