IMPIMP

Liquor sales | बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

by omkar

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – Liquor sales | कोरोना संकटामुळे देशात वर्क फ्रॉम होमचे कल्चर विकसित झाले आहे. हे कल्चर केवळ कामापर्यंत मर्यादित नाही तर हे दारूपर्यंत पोहचले आहे. लोक आता घरात जास्त दारू (alcohol at home) पित आहेत. इंटरनॅशनल वाईन अँड स्पिरिट्स रिसर्च (IWSR) च्या आकड्यांनुसार देशात मागील वर्षी ऑन ट्रेड चॅनलच्या मदतीने 11 टक्के जास्त दारू विकली गेली. हे तोपर्यंत जेव्हा, देशात बार आणि रेस्टॉरंट (bars and restaurants) मध्ये 2020 मध्ये दारूचा खप केवळ 10 टक्के झाला होता.

Five Police Officers Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तात युनायटेड स्पिरिट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद कृपाळू यांनी म्हटले कोरोना संकट काळात (Covid-19 pandemic) लोकांना असे वाटले की, घरात दारू पिणे स्वस्त ठरू शकते. यासोबतच कॅज्युअल गेट टु गेदरची संख्या कमी झाल्याने घरात लोकांनी दारू प्यायल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले.

हे आहे कारण
देशात दारूच्या एकुण खपात बार आणि रेस्टॉरंटची भागीदारी सुमारे एक तृतीयांश आहे. कोरोना संकटामुळे देशात बार आणि रेस्टॉरंट मागील वर्षापासून बंद करावे लागले होते. नंतर जेव्हा त्यांना कामाची परवानगी मिळाली ती सुद्धा खुप कमी क्षमतेसह मिळाली. यानंतर दारू पसंत करणार्‍या लोकांनी घरातच दारू पिणे सुरू केले.

वाढली दारूची विक्री
इंटरनॅशनल वाईन अँड स्पिरिट्स रिसर्चच्या आकड्यांनुसार 2019 मध्ये या बार आणि रेस्टॉरंट चॅनलद्वारे देशाचा एकुण दारूचा खप 27 टक्के झाला होता. तर 2020 मध्ये ही विक्री 10 टक्केवर आली.
कारण लोकांनी घरात दारू पिणे सुरू केले.
यामुळे ऑफ प्रिमाईस किंवा रिटेल स्टोअरची विक्री 88 टक्केवर पोहचली. तर 2019 मध्ये ती 73 टक्के होती.

ऑनलाइन सेलमध्ये डिलिव्हरी चार्जची बाधा
देशाच्या अनेक राज्यात अल्कोहोलच्या होम डिलिव्हरीची परवानगी दिली गेली आहे.
यातून दारूचा ऑनलाइन सेल वाढण्याची अपेक्षा होती.
परंतु डिलिव्हरी चार्ज आणि त्याचे कमजोर फ्रेमवर्क, नियामकाची अनिश्चित पावले आणि गुंतवणुक करण्यात संकोच इत्यादी अडचणी आहेत.
मागच्या वर्षी ऑनलाइन चॅनलच्या मदतीने 53.5 कोटी रुपयांच्या दारूची विक्री करण्यात आली.
ही ओव्हरऑल स्पिरिट मार्केटच्या 0.1 टक्के आहे.

Also Read:

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले –  ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

anti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, 30 जून रोजी होणार होत्या निवृत्त

Related Posts