IMPIMP

Maharashtra Cabinet Decisions | भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, मंत्रिमंडळ बैठकीतील 13 महत्त्वाचे निर्णय

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आज (गुरुवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आला आहे. तसेच भू विकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या (Maharashtra Cabinet Decisions) अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय (Maharashtra Cabinet Decisions)

 

1. नीति आयोगाच्या (NITI Aayog) धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार. शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे. (नियोजन विभाग)

2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर होणार आहे. (सामान्य प्रशासन विभाग)

3. ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ करणार. त्यामुळे भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार. (परिवहन विभाग)

4. 5 जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण (माहिती तंत्रज्ञान विभाग)

5. मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करणार. 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण. (अल्पसंख्यांक विकास विभाग)

6. भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार (सहकार विभाग)

7. “महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क” (MAGNET) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य (पणन विभाग)

8. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे खटले आता मागे घेणार. (गृह विभाग)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

9. माहिती तंत्रज्ञान तज्ञ विभागातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळणार (वित्त विभाग)

10. बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा (जलसंपदा विभाग)

11. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल 311 कोटी करणार. (वित्त विभाग)

12. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 200 कोटींची तात्पूरती वाढ करण्याचा निर्णय. (वित्त विभाग)

13. 1250 मे टन प्रतिदिन गाळप क्षमता 2500 मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार. (सहकार विभाग)

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | Complete loan waiver for farmers who have taken Bhu Vikas Bank loans, 13 important decisions in the Cabinet meeting

 

हे देखील वाचा :

Kidney Disease Home Remedies | किडनी रोगाच्या उपचारासाठी आजमवा हे विशेष घरगुती उपाय, लवकरच मिळेल आराम

Winter Diet | सर्दीपासून बचाव करायचा असेल तर अशा पदार्थांपासून रहा दूर, आहारात ‘या’ हेल्दी वस्तूंचा करा समावेश

Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत

Hair Care Tips | पांढर्‍या आणि गळणार्‍या केसांमुळे त्रस्त आहात का, मग घरातच तयार करा ‘हे’ 2 हेअर ऑईल

 

Related Posts