IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

by nagesh
Chandrakant Patil | minister deepak kesarkar responded to shivsena party split claim made by bjp leader chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल 38 दिवस झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. मंत्री आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळे जनतेची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे मंत्रिमडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) होणाऱ्या विलंबावरुन जनतेमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची आज एक बैठक झाली. यामध्ये उद्या म्हणजे मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. राजभवनावर (Raj Bhavan) हा शपथविधी सोहळा होणार आहे. मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाचे (Shinde Group) 9 तर भाजपचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना फोन गेलाय आणि त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ आता आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असल्याने चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तर त्यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election) आणि आशिष शेलार यांचं संघटन कौशल्य लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे मुंबई पालिका लक्ष्य

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असून तसे संकेत अनेकवेळा दिले आहेत.
2017 च्या निवडणुकीत भाजप केवळ दोन जागांनी शिवसेनेपासून (Shivsena) दूर राहिली.
त्यावेळीही सर्व जबाबदारी आशिष शेलार यांच्या खांद्यावर देण्यात आली होती.
त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आशिष शेलार यांना अधिक ताकद देण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

Related Posts