IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

by nagesh
Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी (Maharashtra Cabinet Expansion) अखेर मुहूर्त मिळाल्याची चर्चा आहे. उद्या म्हणजे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, यावेळी 12 मंत्र्यांचा शपथविधी (Swearing In) होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण विस्तार असणार नाही. पहिल्या टप्प्यात कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याकेडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. मंत्रिमडळाचा विस्तार झाल्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठक (Cabinet Meeting) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. यावेळी एकूण 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात भाजपच्या (BJP) 8 आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) 4 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना अगाेदर पद आणि गोपनयीतेची शपथ दिली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना अगाेदर संधी दिली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. परंतु शपथविधीच्या दिवशीच नेमकं कोण शपथ घेणार हे चित्र स्पष्ट होईल.

 

दरम्यान, राज भवनाबाहेर (Raj Bhavan) अचानक पोलीस (Mumbai Police) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच राजभवनात जाण्यास मज्जाव केला जात आहे. एक-दोन दिवसांत मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याने चेकींग करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कोर्टाच्या निकालाआधीच शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

अधिवेशनाची तारीख निश्चित

विधीमंडळ सचिवांची आज बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा झाली.
तसेच तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्याचे पावसाळी अधिवेशन 10-17 ऑगस्ट दरम्यान घेण्याच
बैठकीत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना
अधिवेशन अवघ्या सात दिवसांचं होणार असल्याने त्याला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

 

Related Posts