IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 2 टप्प्यात?, मंत्री पदासाठी…

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion eknath shinde devendra fadnavis governments cabinet expansion in two phases 

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. यातील पहिला टप्पा येत्या काही दिवसांत होईल आणि त्यात 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

विधानसभा अधिवेशनाच्या (Assembly Session) आधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) पहिला टप्पा होईल. 20 जुलै रोजी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेणेकरुन नव्या मंत्र्यांना विधानसभा अधिवेशनाच्या तयारीसाठी काही दिवस मिळतील. पहिल्या टप्प्यात नेमकं कोण-कोणत्या आमदारांच्या (MLA) गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहण महत्त्वाचं असणार आहे.

 

एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांची (BJP) मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक झाली.
या बैठकीत संबोधित करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे संकेत दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात महत्वाच्या 10 ते 12 खात्यांसाठी मंत्री नेमले जातील.
यासाठी शिंदे गट आणि भाजपमधील महत्वाच्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती समोर आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | eknath shinde devendra fadnavis governments cabinet expansion in two phases

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts