IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | ‘अडचण आहे, मात्र सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका’, नाराज बच्चू कडूंचा इशारा

by nagesh
  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Cabinet Expansion | महिनाभरापासून रखडलेला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पहिला
टप्पा आज पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे (Shinde Group) 9 तर भाजपच्या (BJP) 9 आमंदारांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात
(Maharashtra Cabinet Expansion) एकाही महिला आमदाराला शपथ देण्यात आली नाही. तसेच एकाही अपक्ष (Independent) किंवा मित्र
पक्षाला स्थान दिलं नाही. यावर आता प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion) बच्चू कडू म्हणाले, मी नाराज नाही पण नाराजी सरळ चेहऱ्यावर झळकत आहे. ‘अडचण आहे’ असं सांगून मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही. मात्र, सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे.

 

पहिल्या टप्प्यात अपक्ष आणि मित्र पक्षांना स्थान मिळाले नसले तरी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. शिंदे गट आणि भाजप सरकारमधील मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.

 

बच्चू कडू म्हणाले, पहिल्या टप्प्यातील विस्तारात अपक्ष आणि मित्र पक्षांना स्थान द्यायला हवं होतं.
खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला की महिन्याभरात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल,
तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल,
परंतु महिन्याभरात काय होतं ते बघू, असंही बच्चू कडू म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | prahar bacchu kadu first reaction on cabinet expansion

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | ‘संजय राठोडांना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय’ – भाजप

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, DA बाबत सरकारने संसदेत काय सांगितले, जाणून घ्या

Maharashtra Cabinet Expansion | सत्तांतराच्या नाट्यानंतर 40 दिवसांनी महाराष्ट्राला मिळाले 20 कारभारी, जाणून घ्या शिंदे-फडणवीसांच्या ‘शिलेदारां’ बाबत

 

Related Posts