IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गटात बंडखोरी होईल, शिवसेना खासदाराचा दावा

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन 15 दिवस झाले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्याचा कारभार हाकलताना दिसत आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 165 आमदारांचे बहुमत असताना अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करण्यास सरकार घाबरतंय कशाला असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. तर मंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गटात (Shinde Group) 100 टक्के बंडखोरी होईल असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) यांनी केला आहे.

 

विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत दिसेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघच शिल्लक राहिलेत. मंत्रिपद (Maharashtra Cabinet Expansion) न मिळाल्यास अनेक आमदार (MLA) मानगुटीवर बसणार आहेत. तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर 100 टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झालेत.
त्यांची नाराजी मध्ये मध्ये दिसते.
केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला, अशा शब्दात विनायक राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | shiv sena vinayak raut allegations on eknath shinde devendra fadnavis over cabinet expansion

 

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | महागाईमध्ये जनते सोबतच महापालिकाही भरडतेय ! वीज, पाणीपट्टी पाठोपाठ GST वाढीचा मनपाला फटका; विकासकामांवरील जीएसटी 12 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढविला

Petrol Diesel Price Today | पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी; जाणून घ्या आजचे भाव

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Related Posts