IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकार गोरगरीबांची दिवाळी गोड करणार, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Cabinet Meeting | राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी (Diwali) गोड होणार आहे. शिंदे -फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दारिद्र्यरेषेखालील (Poverty Line) सुमारे दीड कोटी कुटुंबांना नाममात्र दरात रवा, चणाडळ, साखर आणि पामतेल इत्यादी वस्तू देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दारिद्र्यरेषेखालील तब्बल 1 कोटी 62 लाख 42 हजार रेशन कार्ड धारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिलं जाणार आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या 100 रुपयांत मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

– आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार (मदत व पुनर्वसन विभाग)

– पोलीस दलातील (Maharashtra Police) अधिकारी आणि अंमलदार यांना पूर्वीप्रमाणेच घरबंधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार (गृह विभाग)

– नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार, सुधारित खर्चास मान्यता ( नगर विकास विभाग)

– भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार, योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)

– उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा (जलसंपदा विभाग)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cm eknath shinde devendra fadnavis cabinet decision diwali package 1kg sugar oil chana dal rawa in rs 100 for ration card holders

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा, तब्बल 11 महिन्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

MP Udayanraje Bhosale | तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले, उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंवर पलटवार

Amruta Fadnavis | CM शिंदे धमकी प्रकरणाच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; यशोमती ठाकूरांना म्हणाल्या – वेगळा दिमाख असणार्‍या…

Related Posts