IMPIMP

Maharashtra GST Department | 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; GST विभागाची पुण्यात मोठी कारवाई

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra GST Department | दोनशे कोटीपेक्षा अधिक रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी राज्य वस्तू व सेवाकर (GST) विभागाकडून (Maharashtra GST Department) मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाने एका व्यापाऱ्यास ताब्यात घेतलं आहे. आफताफ मुमताज रेहमानी (Aftaf Mumtaz Rehmani) असं त्या व्यापाऱ्याचं नाव आहे. या व्यापाऱ्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने आफताफ याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याबाबत माहिती राज्य कर अधिकारी पुणे (State Tax Officer Pune) यांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात GST विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आफताफ रेहमानी (Aftaf Mumtaz Rehmani) याच्यावर ही कारवाई केली आहे. मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने GST कायदा 2017 याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीद्वारे आफताफ याने 200 कोटी रकमेची केवळ बिले देऊन 41 कोटी 95 लाखांचा I. T. C. (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. तसेच, हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याव्यतिरिक्त दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून जवळपास 27 कोटी 7 लाख रकमेचा रिटर्न प्राप्त करून घेतला आहे. (Maharashtra GST Department)

दरम्यान, असा प्रकार समोर आल्यानंतर GST विभागाने कारवाई केली आहे.
सदरची कारवाई अप्पर राज्यकर आयुक्त, पुणे धनंजय आखाडे (Dhananjay Akhade),
राज्यकर सहआयुक्त, रेश्मा घाणेकर (Reshma Ghanekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव (Dattatraya Amberao)
व सहाय्यक राज्यकर आयुक्त सचिन सांगळे (Sachin Sangale) यांच्या प्रयत्नातून केली आहे.
तसेच, विभागातर्फे वकील महेश झंवर (Lawyer Mahesh Zanwar) यांनी काम पहिले असल्याचे देखील प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Maharashtra GST Department | trader Aftaf Mumtaz Rehmani arrested for paying false bills of rs 233 crore gst department

 

हे देखील वाचा :

BMC ची नवी नियमावली जारी ! लग्न, नववर्षाच्या पार्ट्यांत ठेवा 6 फुटांचे अंतर; 200 व्यक्तींच्या कार्यक्रमासाठीही नियम

Priyanaka Chopra | …म्हणून प्रियंकाने हटवलं तिच्या नावा समोरील अडनाव

MahaTET Exam Scam Case | पुणे पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई, GA Software कंपनीचा सौरभ त्रिपाठी ताब्यात

 

Related Posts