IMPIMP

Maharashtra MLC Election 2022 | महाराष्ट्र विधानपरिषदेची रणधुमाळी ! निवडणुकीची आखणी करण्यासाठी अजित पवार मैदानात; काँग्रेससोबत बैठक संपताच…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची (Maharashtra MLC Election 2022) रणधुमाळी लागली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने (BJP) केलेली खेळी यशस्वी झाल्यानंतर आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलीच कामाला लागली आहे. 20 जूनला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही ताकद पणाला लावली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही अजित पवार यांच्यावरच आहे. सध्याचे संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. पण, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना निवडणून आणण्यासाठी काही मते लागणार आहेत. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. यासाठी अजित पवार रणनीती आखत असल्याचे दिसत आहे.

 

अजित पवार यांनी शिवसेनेच्या (Shivsena) गोटातील अतिरिक्त मते स्वत:कडे फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेच्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा रंगत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार हे अगदी स्पष्ट आहे.
या अनुषंगाने अजित पवार आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात बैठक पार पडली.

 

दरम्यान, आपल्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटातील आमदारांमध्ये जाळं टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सगळ्यात शिवसेनेचं मत अजुन गुलदस्त्यात आहेत.
परंतु, अजित पवार मैदानात सक्रिय झाल्याबद्दल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील माध्यमांना माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | ncp leader ajit pawar meets balasaheb thorat for maharashtra mlc election 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election 2022 | ‘माझ्यासोबत संजय राऊतांना मतदानाला पाठवा किंवा माझ्या मताचा अधिकारच…’ – आमदार देवेंद्र भुयार

Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्‍यालाही मारले

Jhanvi Kapoor | श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने घातला इतका ट्रान्सपरंट स्विमिंग सूट, दिसत होता शरीराचा प्रत्येक भाग, पहा Video

 

Related Posts