IMPIMP

Maharashtra MLC Election 2022 | ‘माझ्यासोबत संजय राऊतांना मतदानाला पाठवा किंवा माझ्या मताचा अधिकारच…’ – आमदार देवेंद्र भुयार

by nagesh
Maharashtra MLC Election 2022 | allow shivsena sanjay raut to come with me for vidhan parishad election 2022 voting says mla devendra bhuyar

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अपक्ष आमदारांवर ताशेरे ओढले. तसेच, राज्यसभा निवडणुकीत काही घोड्यांवर जास्त बोली लागली आणि ते विकले गेले, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर शिवसेना उमेदवाराच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या अपक्ष आमदारांची नावंही राऊत यांनी सांगितली होती. तेव्हा आघाडी समर्थक मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांचे नाव घेतले होते. यानंतर बराच गोंधळ निर्माण झाला. यानंतर भुयार यांनी राऊत याचे सर्व आरोप फेटाळले आहेत. (Maharashtra MLC Election 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आता विधान परिषदेसाठी देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव ठेवला आहे. “विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर तो अपक्षांनीच पाडला, असं संजय राऊत त्यादिवशी 100 टक्के बोलतील. या गोष्टीची जाणीव मला आहे. त्यामुळे मी एकचं ठरवलंय की, मी परवाच्या बैठकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समोर एक प्रस्ताव मांडणार आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन,” असा प्रस्ताव भुयार यांनी मांडला. (Maharashtra MLC Election 2022)

 

पुढे भुयार म्हणाले, “हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदान करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा.
ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील,” असे देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार फुटल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव झाल्याचं विधान संजय राऊत यांनी केले होते.
देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे (Shamsunder Shinde), संजय मामा शिंदे (Sanjay Mama Shinde) या अपक्ष आमदारांची नावं घेत राऊत यांनी घोडेबाजाराचे आरोप केले होते.
यानंतर अपक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भुयार यांनी आपलं मत मांडलं आहे.
दरम्यान आता संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | allow shivsena sanjay raut to come with me for vidhan parishad election 2022 voting says mla devendra bhuyar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विश्रांतवाडी परिसरात मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याने दोघांचा खून; एकाला ढकलून दिल्याचे पाहिल्याने दुसर्‍यालाही मारले

Jhanvi Kapoor | श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने घातला इतका ट्रान्सपरंट स्विमिंग सूट, दिसत होता शरीराचा प्रत्येक भाग, पहा Video

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेलसह 6 पीडित तरुणींची सुटका

 

Related Posts