IMPIMP

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

by nagesh
Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon rain update 27 june 2022 rains in mumbai, latur and some parts of the state

मुंबई : सरकारसत्ता  ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील महिन्यापासून राज्यात गरमीचं वातावरण आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. सध्या ते प्रमाण कमी झाले आहे. हवामानाच्या बदलामुळे लवकरच पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मुंबई (Mumbai) आणि उपनगरांमध्ये (Upnagar) चांगलाच उकाडा जाणवत होता. त्यानंतर आज (मंगळवारी) पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी (Maharashtra Monsoon Update) बरसण्यास सुरुवात झाली आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचं म्हटलं होतं.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने लवकरच डोकं वर काढलं आहे.
आज वांद्रे ते परळ (Bandra to Paral) भागात रिमझिम पाऊस सुरु झाला.
त्याचबरोबर भांडुप घाटकोपर (Bhandup Ghatkopar) दरम्यानही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मात्र, हा मान्सून नसल्याचीच माहिती हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) स्पष्ट करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वत्र परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे.
मात्र हा मान्सून नसल्याचं हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे.
रिमझिम पाऊस म्हणजे मान्सून नव्हे असं सांगितलं आहे.या दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू पुणे जिल्ह्याचा काही भाग,
नाशिक जिल्ह्याचा औरंगाबाद या भागात दिवसा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल असं उपग्रहावरील छायाचित्रांच्या आधारे हवामान विभागाच्या वेबसाईटवर (Meteorological Department Website) सांगितलं. तसेच, नागपूर चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Monsoon Update | mumbai and upnagrs experience rainshowers monsoon rain update mumbai maharashtra konkan

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

Maharashtra Municipal Election | पुणे (PMC), पिंपरी-चिंचवड (PCMC), ठाणे (TMC Thane), नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली (KDMC), कोल्हापूरसह 13 मनपांच्या निवडणुकांसाठी ‘या’ दिवशी होणार आरक्षण सोडत

Related Posts