IMPIMP

Maharashtra Police Recruitment | ‘राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती करणार’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police Recruitment | राज्यात आता सात हजार 200 पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली आहे. ‘मनुष्यबळ अपुरे असल्याने सरकारने पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती केली. आता दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे. तसेच, जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली. (Maharashtra Police Recruitment)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गृहमंत्री वळसे-पाटील शुक्रवारी अहमदनगर (Ahmednagar News) या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ई- टपाल कक्षाचे उद्घाटन झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, ”पोलिसांना सुविधा पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पोलिसांचे वर्तन असले पाहिजे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. हे गुन्हे कमी कसे होतील, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलिसांना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर जनता दरबार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.” (Maharashtra Police Recruitment)

 

दरम्यान, ”राज्यातील 87 पोलीस ठाण्यांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनच्या इमारतींबरोबर पोलिसांसाठी नव्याने वसाहती उभारण्याचा सरकारचा मानस आहे, असं देखील गृहमंत्री वळसे-पाटील सांगितलं. त्यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर (DIG B. G. Shekhar), आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) उपस्थित होते.

 

 

Web Title : Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील 15 वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन मंदिरात लग्न; गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

Pune Crime | पुण्यात 47 वर्षीय नराधम बापाकडूनच 17 व 14 वर्षाच्या मुलींसमोर अश्लील व घाणेरडं कृत्य; पेट्रोल टाकून मारण्याची धमकी

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

 

Related Posts