IMPIMP

Maharashtra Police | पोलीस दलातील ‘बँड्समन’ची पदं कधी भरणार?, DGP आणि गृह विभागाला म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

by nagesh
Maharashtra Police | when will the posts of bandsman in the police force be filled bombay high court aurangabad bench ask to the home department

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन –  महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील बँड्समनची 1480 पदे (Bandsman Post) कधी भरणार, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्यायमूर्ती रवींद्र घुगे (Justice Ravindra Ghuge) व न्यायमूर्ती संजय देशमुख (Justice Sanjay Deshmukh) यांनी गृह विभाग (Home Department) व महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलाचे पोलीस महासंचालक (DGP) यांना केली आहे. तसेच आपले म्हणणे 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औरंगाबाद येथील राजेंद्र बोर्डे (Rajendra Borde) व लातूर येथील सूरज म्हस्के (Suraj Mhaske) या वादक कलावंतांनी औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. चैतन्य धारुरकर (Adv. Chaitanya Dharurkar) यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यामध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये राज्य शासनाच्या (State Government) गृह विभागाने महाराष्ट्र पोलीस खात्यातील (Maharashtra Police) 18 हजार रिक्त पदांच्या मेगा भरतीसाठी (Mega Bharti) जाहिरात प्रकाशित केली. पंरतु यामध्ये बँड्समन पदाची एकही जागा नसल्याने याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील बँड्समनची 1480 पदे कधी भरणार अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाने केली आहे.

 

दरम्यान, याचिकाकर्ते बोर्डे हे सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, युफोनियम, साईड ड्रम वाजवतात.
तर म्हस्के हे ट्रम्पेट वादनात निपुण आहेत. पात्रता असूनही आपण जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीस
मुकणार अशी भीती त्यांना वाटल्याने त्यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली. यावळी शासनाच्या वतीने अ‍ॅड. सुजित कार्लेकर (Adv. Sujith Karlekar) यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

पोलीस खात्यात राज्यभरात जिल्हानिहाय बँड पथके कार्य़रत आहेत. तसेच राज्य राखीव पोलीस बलाची 19
बँड पथके व रेल्वे पोलीस दलाची 4 बँड पथके आहेत. बँड पथकातील भरतीसाठी शारीरिक पात्रतेचे निकष व
मानके शिथिलक्षम असतात. राज्यभरात मोठ्या प्रमाणात बँड्समन पदांची आवश्यकता असतानाही मेगाभरतीत
या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी व्यथा याचिकाकर्त्यांनी गृह विभाग व पोलीस महासंचालक यांच्याकडे
मांडली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Police | when will the posts of bandsman in the police force be filled bombay high court aurangabad bench ask to the home department

 

हे देखील वाचा :

Vidya Chavan | ‘…प्रकाश आंबेडकर यांनी शुध्दीवर येवून बोलावे;’ शरद पवार यांच्यावरील टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे प्रतिउत्तर

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना

Uddhav Thackeray | ‘…आणि ती घोषणा थेट काश्मिरात पोहचली;’ उद्धव ठाकरे यांनी सांगितला तो भन्नाट किस्सा…

 

Related Posts