IMPIMP

Vidya Chavan | ‘…प्रकाश आंबेडकर यांनी शुध्दीवर येवून बोलावे;’ शरद पवार यांच्यावरील टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे प्रतिउत्तर

by nagesh
Vidya Chavan | ncp leader vidya chavan slams prakash ambedkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Vidya Chavan | एका कार्यक्रमादरम्यान बोलताना वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचेच असल्याचे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सडकून टीका करत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी प्रकाश आंबेडकर यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘पवार साहेब काय आहेत? हे अवघ्या देशाने पाहिलेले आहे. ज्यावेळी प्रकाश आंबडेकर यांनी भाजपाची बी टीम असलेल्या एमआयएमसोबत (AIMIM) हातमिळवणी केली होती. त्यांच्यासोबतही आंबेडकरांचे पटले नाही. त्यांचे कुणासोबतच पटू शकत नाही. त्यामुळे प्रकाश आंबडेकर यांनी लवकरच शुद्धीवर यावे.’ अशी खोचक टीका विद्या चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली आहे.

 

तर यावर पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘शरद पवार भाजपाचे असते तर महाविकास (MVA) आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन त्यांनी भाजपाला (BJP) रोखले नसते. ५० खोके, एकदम ओके करुन आणि सूरत तसेच गुवाहटीच्या कामाख्या देवीला आमदारांना नेऊन मविआ सरकार पाडण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर बोलतात म्हणून पवार साहेब भाजपाचे होत नाहीत. आंबेडकरांच्या शब्दावर देश चालत नाही. पवार साहेबांची उंची काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) नाव देण्यासाठी पवारांनी सत्तेचा विचार केला नाही. सत्तेसाठी काम करणारे पवार साहेब नाहीत. प्रकाश आंबडेकर यांनी शुद्धीवर येऊन बोलले तर बरे होईल.’ असंही यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या.

 

दरम्यान, एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार
यांच्यावर टीका केली होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, ‘शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा सकाळचा शपथविधी
झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवार यांची एक मुलाखत छापून आली होती.
त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं.
मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं.’ असं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
त्यावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vidya Chavan | ncp leader vidya chavan slams prakash ambedkar

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना

Uddhav Thackeray | ‘…आणि ती घोषणा थेट काश्मिरात पोहचली;’ उद्धव ठाकरे यांनी सांगितला तो भन्नाट किस्सा…

Chandrakant Patil | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार, लवकरच दिल्लीतून घोषणा – चंद्रकांत पाटील

 

Related Posts