IMPIMP

Maharashtra Political Crisis | ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, ‘या’ तारखेला होणार सुनावणी

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असून
यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता
22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटामध्ये धाकधूक वाढली
आहे. 8 ऑगस्टला होणारी सुनावणी 12 ऑगस्ट पर्यंत लांबवणीवर पडली. त्यानंतर पुन्हा ही सुनावणी लांबवणीवर पडली आहे.

 

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा सर्वात मोठा परिणाम राज्यातील राजकारणावर (Maharashtra Political Crisis) होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice N. V. Ramanna) हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी कायम राहिल याची शक्यता आता कमी आहे. या आधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यामुळे आता या प्रकरणाचं काय होईल हे 22 ऑगस्टला स्पष्ट होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही सुनावणी 10 दिवस लांबणीवर का गेली यामागे काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 40 समर्थक आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला होता.
त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने 16 आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना दिलं होतं.
त्यानंतर शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | hearing postponed hearing to be held on august 22 in supreme court maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Nitish Kumar On Loksabh Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार बनणार ? नितीश कुमार यांचं विधान, म्हणाले…

MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

NCP Chief Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्हाबाबत शरद पवारांचा शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

 

Related Posts