IMPIMP

Maharashtra Political Crisis | पृथ्वीराज चव्हाण बोलले तेच न्यायालयात झालं, शिंदे गटाने ठाकरेंची तीच चूक दाखवली !

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा (CM) घाईघाईने राजीनामा (Resignation) देऊन मोठी चूक केली, असं रोखठोक मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Senior Congress Leader) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी मांडलं होतं. आज चव्हाण यांच्या दाव्याला पुष्टी देणारे किंवा त्यांचा दावा अधोरेखित करणारा युक्तीवाद शिंदे गटाचे (Shinde Group) वकील महेश जेठमलानी (Lawyer Mahesh Jethmalani) यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला म्हणजे सरकारकडे बहुमत ( Maharashtra Political Crisis) उरलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं आहे, असे जेठमलानी यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितले. म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हा राज्याच्या सत्तासंघर्षात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद काय ?

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आजच्या सुनावणीदरम्यान या दोन मुद्यांवर भर दिला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बहुमत चाचणीत पराभव झाल्यामुळे शिंदे-फडणवीस हे नवीन सरकार अस्तित्त्वात आलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने नवे सरकार स्थापन झाले. जर मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीला (Majority Test) सामोरे जाण्यास नकार दिला तर त्यांच्याकडे बहुमत नाही, हे अपेक्षित धरले जाते, असे जेठमलानी यांनी सांगितले. (Maharashtra Political Crisis)

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा ही मोठी चूक होती का, याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर बंडखोरांनी व्हिपच्या विरोधात मतदान केल्याचा मुद्यावरुन त्यांना कयदेशीररित्या पेचात पडकता आले असते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्याआधीच राजीनामा दिला.

 

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी घाईगडबडीमध्ये राजीनामा (Resignation) दिला, ही फार मोठी चूक केली आहे. विधिमंडळामध्ये जाऊन त्यांनी भाषण केलं पाहिजे होतं. आपलं मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले, हे सर्व अधिकृतपणे सदनामध्ये सांगायला पाहिजे होतं, असं चव्हाण यांनी सांगितलं होते.

 

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले होते ?

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यावर फुटलेल्या आमदारांनी विरोधात मतदान केलं असतं.
मग अँटी डिफेक्शन लॉ-परिशिष्ट 10 (Anti-Defection Law-Schedule 10) लागू झाले असते.
ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केलं, ते सगळे अपात्र ठरले असते. पण तसं घडलं नाही.
तलवार आधीच म्यान करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांनी मग पुढे लार्जेस्ट मेजॉरिटी पार्टी (Largest Majority Party) होती, त्याला निमंत्रण दिलं.
त्यामुळे माझ्या मते सध्या हे प्रकरण इंटरेस्टिंग झालेलं आहे.
सुप्रीम कोर्ट आता राज्यघटनेचा कसं सुसंगत अर्थ लावतो, हे देखील बघितलं पाहिजे,
असे मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Senior Advocate Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Maharashtra Political Crisis | maharashtra political crisis shivsena uddhav thackeray vs eknath shinde mahesh jethmalani argument has point raised by prithviraj chavan

 

हे देखील वाचा :

Uday Samant attack In Pune | उदय सामंत हल्ला प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

Uddhav Thackeray | शिवसेना संपत चाललीय म्हणणारे भाजपाध्यक्ष जेपी नड्डांना उद्धव ठाकरेंचे सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले…

Pune Crime | 10 हजारांचा हप्ता न दिल्याने हॉटेल चालकावर तलवारीने वार करुन केली तोडफोड

 

Related Posts