IMPIMP

Maharashtra Political Crisis | फ्लोअर टेस्टसाठी एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

by nagesh
Cabinet Expansion | know how many independent mlas will be minister in eknath shinde and devendra fadnavis government

सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर फ्लोअर टेस्टसाठी आपण उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत (Mumbai) येणार असल्याचे स्वत: शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्रावरील राजकीय संकट लवकर टळू दे असं मागणं देवीकडे मागितलं असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे देवीच्या दर्शनासाठी परवानगी मागितली होती. (Maharashtra Political Crisis)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचे दर्शन हा श्रद्धेचा विषय आहे. देवीकडे सर्वच जण आपलं मागणं घेऊन येतात. देवी त्यांना आशीर्वाद देते. त्यामुळे आपण इकडे आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत अशी मागणी देवीकडे केली आहे. उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत येणार आहे. फ्लोअर टेस्टसाठी जी काही प्रक्रिया करायची आहे ती आम्ही पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, प्रसार माध्यमातून दाखवण्यात येत असलेल्या वृत्ताचा आधार घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातून शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला असल्याचे दाखवण्यात येत आहे.
तसेच अपक्ष आमदारांनी ई-मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा दावा केला आहे.
विरोधी पक्षाने घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली आहे.
माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे,
असे राज्यपालांनी या पत्रात नमूद केले आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena revolt eknath shinde mla group to reach mumbai tomorrow to arrive with all mla for floor test mahavikas aghadi government

हे देखील वाचा :

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

Pune Municipal Corporation (PMC) | उरुळी देवाची व फुरसुंगी टी.पी. स्किम बाह्यवळण मार्गाची रुंदी कमी करण्याच्या हरकती, सूचनांवर लवकरच सुनावणी

Maharashtra Police Recruitment | राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार; गृहविभागाची अधिसूचना जारी

Related Posts