IMPIMP

Maharashtra Politics Issue | कोर्टाची तारीख पे तारीख !, अंबादास दानवे म्हणाले – ‘जज साहब तारीख तो मिल रही है, पर…’

by nagesh
Maharashtra Politics Issue | | ambadas danve comment on maharashtra political crisis next hearing on 14th feb

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra Politics Issue | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. आज काही तरी निर्णय होईल अशी अपेक्षा शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना होती. मात्र पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Politics Issue) लांबणीवर पडला आहे. न्यायालयात चालढकल सुरु असल्याने राज्यातील नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ‘जज साहब तारीख तो मिल रही है, पर इन्साफ नही मिल रहा’, अशी परिस्थिती झाल्याची प्रतिक्रिया दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार नाही

अंबादास दानवे म्हणाले, जज साहब तारीख तो मिल रही है पर इन्साफ नही मिल रहा, तारीख पर तारीख अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे. आयोग आता नेमकं कशाला हात घालतं पाहावं लागेल. कोर्टात काही निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) ताऱीख काही ठरणार नाही. ते पुढे म्हणाले, एका महापालिकेच्या निवडणुकीसाठा देशाच्या पंतप्रधानांना यावे लागते. यावरुन या ठिकाणचे नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होते. हा शिवसेनेचा विजय मानावा लागेल.

 

संजय राऊतांचा दावा खोटा ठरणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला (Maharashtra Politics Issue) तारीख पे तारीख सुरुच आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख मिळाली आहे. यावर शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, आता सुनावणी 14 फेब्रुवारीला सुरु होत असल्याने संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने मी यावर फार बोलणार नसल्याचे केसरकर म्हणाले.

 

सर्व काही प्रेमाने होईल

आमचं घटनेवर प्रेम आहे. 14 फेब्रुवारीपासून घटनापीठ (Constitution Bench) सलग सुनावणी घेणार आहे.
ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्राचा प्रकरणावर 14 फेब्रुवारीपासून सुनावणी घेऊ. 14 फेब्रुवारीचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस (Valentine’s Day) आहे. सर्व काही प्रेमाने होईल, असे संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics Issue | | ambadas danve comment on maharashtra political crisis next hearing on 14th feb

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, ‘न्यायव्यवस्थेला कोणी…’

Pune Pimpri Crime | मला तू कॉलेजपासून आवडते म्हणत महिलेसोबत गैरवर्तन, आरोपी गजाआड; तळेगाव दाभाडे येथील घटना

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

 

Related Posts