IMPIMP

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या मंत्रिपदाबाबत रोहित पवारांचं मोठं विधान, म्हणाले….

by nagesh
Maharashtra Politics News | ncp rohit pawar claims that bacchu kadu will not get ministry in next cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Maharashtra Politics News | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्यांवर महाविकास आघाडी
(Mahavikas Aghadi) आणि राज्य सरकार (State Government) यांच्यात खटके उडत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra
Cabinet Expansion) रखडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर (Maharashtra Politics News) टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ
विस्तार होत नसल्याने शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) आणि मित्रपक्ष नाराज आहेत. शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंनी
(Bachchu Kadu) जाहीर नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांच्या मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar)
यांनी मोठं विधान केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Politics News) रखडला असताना कोर्टातही त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे सध्याचे सरकार लोकांचा आणि जनतेचा विचार करत नाही. त्यांना फक्त भाजपच्या (BJP) काही लोकांना आणि शिंदे यांच्या 40 लोकांना खुष ठेवायचे काम सुरु असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. तसेच यावेळी बोलताना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळणार नाही, याची गोळाबेरीज रोहित पवार यांनी सांगितली.

 

एकनाथ शिंदे गटातील 40 जणांनाही मंत्रिपद हवं आहे. तसेच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रीपद पाहिजे. रेशो वाढला तर पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद मिळू शकते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला 12 किंवा जास्तीत जास्त 14 पर्यंत मंत्रिपद मिळतील. बाकीच्या 26 जणांना काय मिळणार? त्याला एक पर्य़ाय आहे. आपल्याकडे अनेक मंडळे आहेत. त्यांनी मंडळे वाढवली आहेत. अधिवेशनात त्यांना निधी दिला नाही. केवळ भाषण केलं. जेव्हा मंडळे येतील त्यावेळी आमदारांना त्यांचे वाटप केले जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा दवा रोहित पवार यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | ncp rohit pawar claims that bacchu kadu will not get ministry in next cabinet expansion

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Decision | शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Politics News | ‘फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या’, ठाकरे गटाच्या खासदाराने घेतली अमित शहांची भेट

NCP MLA Rohit Pawar | ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत’, रोहित पवारांचा संताप, म्हणाले- ‘महाराष्ट्राच्या जखमेवर…’

 

Related Posts