IMPIMP

Maharashtra Politics | आम्ही काँग्रेस-शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar big claim over

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Politics | आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी (Congress and Shiv Sena Alliance)  करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर ( Vanchit Bahujan Aghadi Sarvesarva Prakash Ambedkar) यांनी म्हटले. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्षानेच महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) पाडण्याचा विडा उचलला होता, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला. (Maharashtra Politics )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाने बंडखोरी (Shinde group rebellion) करताना आपल्या बंडखोरीचे खापर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) फोडले होते. आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीही मविआ सरकार पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

 

केंद्रातील भाजप सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आणि विरोधकांवर आंबेडकर यांनी टीका केली. आंबेडकर म्हणाले, देशाची राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. नेहरुंनी कबुतरे सोडली होती. मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे. (Maharashtra Politics)

 

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करताना आंबेडकर पुढे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारी संपत्ती
विकण्यावरून ज्या पद्धतीची टिप्पणी केली होती, ती पाहता मी दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटले होते, की एखाद्या दारुड्याला दारुसाठी पैसे मिळाले नाही की, तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो, तशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे वर्तन आहे. याला आता रिझर्व बँकेकडून (RBI) पुष्टी देण्यात आलेली आहे.

 

दरम्यान, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या गंभीर आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | prakash ambedkar says ncp wants to turn down mahavikas aghadi govt thackeray govt

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Nanded | लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीच्या जाळ्यातून पलायन

Shivsena Vs MNS | शिवसेना-मनसेत जुंपली ! दानवे म्हणाले – ‘मनसे भाजपाची दुसरी शाखा, संदीप देशपांडेंनी दिले प्रत्युत्तर’

Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Changes In NPS | NPS नियमांमध्ये झाले 4 मोठे बदल; ई-नामांकनपासून विदड्रॉलपर्यंत का भासली ‘या’ बदलांची गरज

 

Related Posts