IMPIMP

Maharashtra Politics | शिवसेना शिंदे गट, मनसेसोबत युती भाजपच्या स्थानीक इच्छुकांना परवडणार?

मनसेच्याच जागांवर विजय मिळवित भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळविली आहे

by nagesh
Maharashtra Politics | Shiv Sena alliance with Shinde Group, MNS will afford BJP's local aspirants?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्यावतीने आयोजित दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावल्याने आगामी निवडणुकांमध्ये BJP,
शिवसेनेचा शिंदे गट आणि MNS ची आघाडी होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेच्या सत्तेला सुरूंग
लावण्यासाठी ही आघाडी होण्याची शक्यता वाढली असतानाच पुण्यासारख्या अन्य शहरांमध्ये जेथे भाजपची एकहाती सत्ता आहे तेथे मनसेला सोबत घेणे
भाजपला परवडणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सहा महिन्यांपुर्वी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आणत हिंदुत्वाची भूमिका जाहीर केली. भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोरच भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्यात येईल असा इशारा ठाकरे यांनी दिल्यानंतर काही महिने राज्यातील वातावरण गरम झाले होते. राज्यातील तत्कालीन आघाडीविरोधात हे आंदोलन असल्याने भाजपने मनसेच्या भुमिकेला पाठींबा दिला. मात्र, चार महिन्यांपुर्वी राजकिय उलथापालथ होउन महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) कोसळले. शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामुळे भाजपसोबत युती करून सत्तेत जाण्यासाठी उत्सुक असलेल्या राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना काही अंशी धक्का बसला. अशातच दोन आठवड्यांपुर्वी राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. यामुळे पुणे (Pune), नाशिकसह (Nashik) मुंबईमधील (Mumbai) मनसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. (Maharashtra Politics)

 

दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. पाठोपाठ भाजपच्या नेत्यांची ठाकरे यांच्या निवासस्थानावरील वर्दळ वाढली. नुकतेच दिवाळीचे औचित्य साधून मनसेच्यावतीने शिवाजी पार्कवर आयोजित दिपोत्सवाला शिंदे आणि फडणवीस यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने युतीचे संकेत मिळाल्याने मनसेचे इच्छुक सुखावल्याचे पाहायला मिळत आहे.

 

मनसेला युतीच्या माध्यमातून सत्ता खुणावत असली तरी मनसेला सोबत घेतल्यास आपल्याला कमी जागांवर लढावे लागणार? या शंकेने पुणे, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) सारख्या शहरातील इच्छूकांना घेरले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. पुन्हा त्याच ताकदीने सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्तेने विरोधकांच्या प्रभागातही भाजपची ताकद वाढली आहे. निवडणुका लांबल्या असल्यातरी भाजपच्या इच्छुकांनी प्रभागांमध्ये बांधणी केलेली आहे. मागील निवडणुकीत पुणे महापालिकेत ९८ नगरसेवक असलेल्या भाजपने विरोधकांसोबतच मनसेच्याच सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. २०१२ मध्ये मनसेचे २९ नगरसेवक होते. २०१७ हीच संख्या अवघ्या २ वर आली होती. त्यामुळे भाजपसोबत युती ही मनसेची गरज असली तरी भाजपची निश्‍चितच नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुसरीकडे राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असली तरी पुणे शहरात शिंदे गटामध्ये गेलेला एकमेव नगरसेवक आहे.
शिंदे गट ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील असला तरी त्यांचा डोळा मनसेवरच अधिक आहे.
भाजपसोबत युती नाही झाली तरी शिंदे गटाच्या माध्यमातून युतीमध्ये जाण्याचा खुश्कीचाा मार्ग
मनसेच्या इच्छुकांना अगदी जवळचा असल्याने शिंदे गटांला मनसेतूनच इनकमींग सोपे आहे.
मनसेने हा मार्ग चोखळला तरी मनसेची ताकदवर इच्छूक कोथरूड, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, कात्रज परिसरात (Katraj) अधिक आहेत.
शिवाजीनगर (Shivaji Nagar) आणि कसब्यातील बहुतांश इच्छुक पुर्वीच भाजपमध्ये गेलेले आहेत.
अशा परिस्थितीत स्वपक्षातील इच्छुकांना डावलून मित्र पक्ष शिंदे गट आणि मनसेला जागा सोडणे व त्यांच्यासाठी प्रचार करणे हे भाजपच्या स्थानीक इच्छुकांसाठी ‘सुळावरची पोळी’ ठरणारे आहे.
यामुळेच सध्या भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या युतीचे संकेत मिळत असले तरी ग्राउंड लेव्हलवर तिचे स्वागत होणे आणि युतीधर्म टिकविणे अवघडच राहाणार आहे

 

Web Title :- Maharashtra Politics | Shiv Sena alliance with Shinde Group, MNS will afford BJP’s local aspirants?

 

हे देखील वाचा :

MLA Ravi Rana | मी त्यांना योग्य वेळ आल्यावर…, आमदार रवी राणांचा बच्चू कडूंना इशारा

POCSO Court | तो 16 वर्षीय मुलीला म्हणाला ‘आयटम’, लैंगिक छळाचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

Ashish Shelar | ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौरे करत आहेत, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

Related Posts