IMPIMP

Maharashtra Rain Update | पुणे, मुंबईसह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर; कोकण, विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’

by nagesh
Maharashtra Rain Update | heavy rain in some parts of the state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. आज (मंगळवार) काही भागात हलका ते मध्यम पाऊस (Maharashtra Rain Update) पडत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, आजही मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे. कोकणासह विदर्भात (Vidarbha) पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात (Pune) संततधार सुरूच आहे. तर मुंबईच्या (Mumbai) विविध भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Update) पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही भागात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

भिवंडीत (Bhiwandi) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर दुसरीकडे पांजरापोळ परिसरात जीर्ण इमारतीची संरक्षक भिंत अचानक कोसळली आहे. या अपघातात भिंत ट्रकवर कोसळल्याने ट्रकचे नुकसान झाले असून मोठी दुर्घटना टळली. देवजीनगर परिसरात यंत्रमाग कारखान्यावर झाड कोसळले आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पावसामुळे वातावरणात दव निर्माण झाले असून त्यामुळे शेतीची कामे वेगात होणार आहेत. पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, नागपूर हवामान विभागाने (Nagpur Meteorological Department) दि. 27 आणि दि. 28 जून
साठी विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त केला आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून गतिमान होऊन विदर्भात शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगढ वर केंद्रित झाला आहे.
त्यामुळे पुढील दोन दिवस पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा तसेच पश्चिम विदर्भात (West Vidarbha)
मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.28 जूननंतर मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कमी दाबाचे
क्षेत्र स्थिरावणार आहे. पश्चिम विदर्भात मान्सूनची जोरदार हजेरी लागेल, असा हवामान खात्याचा (IMD) अंदाज आहे.

Web Title : Maharashtra Rain Update | heavy rain in some parts of the state

Related Posts