IMPIMP

Maharashtra Rains | आगामी 48 तासांत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; पुण्यासह ‘या’ जिल्हांना ‘अलर्ट’

by nagesh
Rain in Pune | Against the backdrop of heavy rains, a restraining order has been issued in Gadkille, a tourist spot in Pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात (Maharashtra Rains) मागील 2 आठवड्यापासून पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे जलमय वातावरण झालं आहे. धरणं आणि नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, आगामी 48 तास महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे. यामुळे पुण्यासह (Pune) अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे.
याचाच परिणाम गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra Rains) अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे.
आज (मंगळवारी) पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red alert) दिला आहे.
त्याचबरोबर पुण्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे या 15 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे.
उद्या (बुधवारी) नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे आणि रायगड या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे.
याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उद्या पुणे आणि मुंबईला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या दरम्यान, आगामी काही तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall alert in maharashtra for next 48 hours imd alerts give orange alert pune

 

हे देखील वाचा :

MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्यावरील आरोपांशी सईद खानचा संबंध काय?, जाणून घ्या

Jayant Patil | ‘धनंजय मुंडेंना पुढच्या 10 निवडणुका कोणी हरवू शकत नाही’ – जयंत पाटील

Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

 

Related Posts