IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात गारपिटीचं सावट ! विकेंडला पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची (Dry Weather) नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खान्देश (Khandesh) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) थंडीचा (Cold Wave) कडाका जाणवला. परंतु त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामानाची (Maharashtra Rains) नोंद झाली आहे. येत्या विकेंडला (Weekend) राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meteorologist) व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खान्देश, विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) पुढील दोन दिवस दाट धुक्यासह (Fog) गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी याच भागात तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार पावसासह (Torrential Rain) गारपीट होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसांत कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूरमध्ये (Solapur) थंडी कमी होणार आहे. यानंतर या संबंधित परिसरात अनेक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे.

 

 

विकेंडला पावसाची शक्यता
हवामान खात्याने (IMD) शनिवारी (दि.22) पुण्यासह, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि रायगड या 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी हवामान खात्याने कोणताही इशारा जारी केला नसला तरी विकेंडला या ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर विकेंडला कोकणात फिरायला जायचा प्लॅन बनवत असाल तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिमालय परिसरात पावसाची शक्यता
दुसरीकडे 21 ते 23 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालय (Western Himalayan) परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे.
दरम्यान तुरळक ठिकाणी हिमवर्षाव (Snowfall) होण्याची शक्यता आहे.
तर 22 जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसासह बर्फवृष्टी होणार आहे.
तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील तीन दिवस दाट धुके पडणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | light to moderate rainfall and hailstorm possibilities in 11 districts including pune mumbai know in deatils

 

हे देखील वाचा :

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

PM Kisan | सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत पैसे, तात्काळ करा अपडेट

 

Related Posts