IMPIMP

Maharashtra Rains Update | राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील 3 दिवस मुसळधार – IMD

by nagesh
Maharashtra Rains Update | weather report vidarbha gadchiroli konkan marathawada maharashtra rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार (Maharashtra Rains Update) असल्याचे हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) सांगण्यात आले आहे. पुढील तीन दिवसामध्ये राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील (Vidarbha) काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असल्याने राज्यभर जलमय वातावरण असणार आहे.

जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. दरम्यान, आता पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे. तर, विदर्भात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rains Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, मागील दोन आठवड्यात मुसळधार पावसाने नदी, नाले, धरणे तुडुंब भरले आहेत.
धरणांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. असं असलं तरी ऑगस्ट महिन्यामध्ये 10 ते 12 दिवस पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे.
तसेच, पुढील दोन महिने मोठ्या पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीनवेळा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, राज्यात यंदाचे पर्जन्य दिलासादायक असणार आहे.

Web Title :- Maharashtra Rains Update | weather report vidarbha gadchiroli konkan marathawada maharashtra rain updates

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

Ramdas Kadam | 1995 मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? – रामदास कदम

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

Related Posts