IMPIMP

Manisha Kayande | उत्तरे नसली की टिंगळटवाळी करायची हा सत्ताधाऱ्यांचा धंदा आहे – मनिषा कायंदे

by nagesh
Manisha Kayande | If there are no answers, it is the business of those in power to ridicule - Manisha Kayande

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – राज्यात टाटा एअरबस प्रकल्पावरुन (Tata Airbus Project) विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची जुंपली आहे. राज्यातून एकामगोमाग एक प्रकल्प जाण्याला शिंदे यांचे नाकर्ते सरकार जबाबदार असल्याचे विरोधकांचे मत आहे. तसेच ओला दुष्काळ ही मागणी देखील प्रलंबित आहे. त्यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात खडाजंगी सुरु आहे. त्यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या (Thackeray Group) प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाष्य केले आहे. प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, तर वैयक्तित टीका करायची हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे, असे मनिषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सरकारला आम्ही प्रश्न विचारत आहोत. आम्हाला उत्तरांची अपेक्षा आहे. पण, जर प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, तर समोरच्याला छोटा पप्पू, पेंगविन, अशा प्रकारचे म्हणायचे काम सत्ताधारी करत आहेत. गुजरातला प्रकल्प जात असल्याने आदित्य ठाकरे यांनी काल सरकारची चिरफाड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रत्येक विधानाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातले अनेक उद्योग फक्त गुजरातमध्येच का जात आहेत? असा प्रश्न मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उपस्थित केला.

 

आगामी सर्व निवडणुकांसाठी कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि इतर जागांवर नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.
तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या रिक्त जागा ज्यावरील लोक शिंदे गटात (Shinde Group) गेले आहेत,
त्या जागांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आदी कामे पार पडली.
तसेच संघटनात्म आढावा घेण्यासाठी बैठका सुरु आहेत. मुंबई महानगरपालिका
(Mumbai Municipal Corporation) घशात घालण्याचा भाजपचा (BJP) डाव आहे.
त्यासाठी ते षडयंत्र आखत आहेत. त्याचमुळे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांच्या मागे चौकशींचा ससेमिरा लावणे
असे उद्योग भाजप आणि शिंदे करत आहेत. तसेच शिवसेनेत असताना ज्या नेत्यांवर आणि लोकांवर भाजपने
विविध आरोप केले होते, त्यातील अनेकजण आता शिंदे आणि भाजपमध्ये गेले आहेत.
त्यामुळे त्या सर्वांचे पुढे काय झाले, त्यांच्या चौकशांचे पुढे काय झाले, हे देखील शिंदे आणि भाजपने सांगणे आवश्यक आहे, असे यावेळी मनिषा कायंदे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Manisha Kayande | If there are no answers, it is the business of those in power to ridicule – Manisha Kayande

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | ‘पहिली वेळ माफ आहे…. पण आमच्या वाटेला जाणाऱ्यांना…’, बच्चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’

Pune Crime | 35 हजारांचे घेतले दीड लाख रूपये; शेकडा 10 टक्क्यांनी उकळले व्याज, आरोपीला अटक

Pune CNG Pump | पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! आज पासून पुणे ग्रामीण भागातील CNG पंप अनिश्चित काळापर्यंत बंद

 

Related Posts