IMPIMP

Bachchu Kadu | ‘पहिली वेळ माफ आहे…. पण आमच्या वाटेला जाणाऱ्यांना…’, बच्चू कडूंचा रवी राणांवर ‘प्रहार’

by nagesh
  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना दिला आहे. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मेळाव्याला (Prahar Sanghatana) सुरुवात झाली. यावेळी बोलताना बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पहिली चूक आहे म्हणून माफ केलं पण यानंतर जर कोणी ‘वार’ केला तर ‘प्रहार’ केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत त्यांनी रवी राणांना थेट इशारा दिला.

 

मी जेव्हा निवडणुकीला बाहेर पडलो, तेव्हा कोणत्या बिल्डरच्या घरी गेलो नाही. आम्ही मंदिर, मशीद, धर्म, जातीचं राजकारण केलं नाही. गोरगरीब, अपंगांसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं, त्यांचा कधी राजकारणासाठी वापर केला नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

 

बच्चू कडू पुढे म्हणाले, सत्तेसाठी कधीच लाचारी केली नाही.
सत्ता आणि पदापेक्षा माझ्यासाठी माझी लोकं महत्त्वाची आहेत.
मी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना मानतो.
मात्र माझ्या डोक्यात भगतसिंग (Bhagat Singh) आहेत, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विचारपूर्वक बोलावे
असा इशारा त्यांनी दिला. पहिली वेळ होती म्हणून माफ केल्याचे म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या
दिलगिरीनंतर एक पाऊल मागे घेतल्याचे दिसून येते.
परंतु, यापुढे कोणी वार केला तर प्रहार केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
आम्ही कोणत्या पक्षाचा नव्हे तर विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आमच्या पासून सावध रहा.
आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी, सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण तुम्हाला सोडणार नसल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bachchu Kadu | bacchu kadu criticized to ravi rana on allegation of 50 cr

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 35 हजारांचे घेतले दीड लाख रूपये; शेकडा 10 टक्क्यांनी उकळले व्याज, आरोपीला अटक

Pune CNG Pump | पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! आज पासून पुणे ग्रामीण भागातील CNG पंप अनिश्चित काळापर्यंत बंद

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

 

Related Posts