IMPIMP

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

by nagesh
MLA Pratap Sarnaik | CM eknath shinde group mla pratap sarnaik donates gold worth 37 lakh in tuljabhavani temple in osmanabad district

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – MLA Pratap Sarnaik | शिंदे गटाचे आमदार प्रतापराव सरनाईक (MLA Pratap Sarnaik) त्यांच्या
कुटुंबासह तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी सुमारे 37 लाख 50 हजारांचे सोने अर्पण केले. त्यांनी केलेला नवस पूर्ण
झाल्याने त्यांनी सोने दागिन्यांच्या स्वरूपात देवीला दान केले, अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी मी आमची कुलदैवत तुळजाभवानी देवीच्या (Aai Tulja Bhavani Devi) चरणी नवस केला होता. आता माझ्या दोन्ही नातवांचे जावळ काढायचे होते, तर त्याचे औचित्य साधत नवस फेडायला आलो आहे. नवस केला तेव्हा 51 तोळ्यांची पादुका आणि 21 तोळ्यांचा सोन्याचा हार देईल असा नवस केला होता. पण कोरोना आणि इतर अडचणींमुळे यायला जमलं नाही. पण आता नवस फेडत आहे. हे, प्रसिद्धीसाठी केलं नाही,’ असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

 

देवीला केलेला नवस पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुलं, सूना आणि नातू यांना घेऊन आलो, असल्याचेही ते म्हणाले.
“मी 51 तोळ्याची पादुका पहिल्या मुलाच्या लग्नावेळी आणि 21 तोळ्याचा हार दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी घालेन
असा नवस केला होता. साकडं पत्नीनेच घातलं असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते.
दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरं बंद होती, तसंच इतर संकटं आमच्यावर होती,
त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो,” अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे.
(MLA Pratap Sarnaik Visit Tuljapur Aaai Tulja Bhavani Mandir)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Pratap Sarnaik | CM eknath shinde group mla pratap sarnaik donates gold worth 37 lakh in tuljabhavani temple in osmanabad district

 

हे देखील वाचा :

Vikram Gokhale | विक्रम गोखले व्हेंटिलेटरवर, उद्या सकाळी मेडिकल बुलेटिन; रुग्णालयाकडून माहिती

Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर

Pune Crime | पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह 7 जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 108 वी कारवाई

 

Related Posts