IMPIMP

Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Cyber Police Station - Woman cheated in the name of selling furniture in the name of Facebook friend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | बँकेचे गोल्ड व्हॅल्युअरने (Gold Valuer) कर्जदारांशी संगनमत करुन खोटे दागिने (Fake Jewelry) असताना ते खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन अहमदनगर शहर बँकेची (Ahmednagar City Bank) फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे शाखाधिकारी मंदार सुरेश सुभेदार (Mandar Suresh Subhedar) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१५/२२) दिली आहे. त्यानुसार अजित प्रभाकर कुलकर्णी (Ajit Prabhakar Kulkarni), मारुती शिवाजी सूर्यवंशी (Maruti Shivaji Suryavanshi), सुनिल रघुनाथ कदम (Sunil Raghunath Kadam), वैजयंती सुनिल कदम (Vaijayanti Sunil Kadam), केतन विलास अमराळे (Ketan Vilas Amarale), सनी देवीदास बलकावडे (Sunny Devidas Balkawde) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १० नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कुलकर्णी हे अहमदनगर शहर सहकारी बँकचे गोल्ड व्हॅल्युअर आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जदारांशी संगनमत केले. इतर आरोपी यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने हे खोटे असल्याचे त्यांना माहिती होते. तरीही त्यांनी ते खरे असल्याचे भासवून बँकेला हे दागिने खरे असल्याबाबत बनावट प्रमाणपत्र दिले. कर्जदारांनी हे दागिने बँकेकडे गहाण ठेवले. त्याबदल्यात बँकेने २२ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज दिले. प्रत्यक्षात कर्जफेड न झाल्याने बँकेने दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा ते खोटे असल्याचे आढळून आल्याने आता फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावळे (Sub-Inspector of Police Sawle) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Gold valuer defrauded Ahmednagar city bank by pledging fake gold

 

हे देखील वाचा :

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

Pune Crime | जामिनदाराच्या आत्महत्येप्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde | पन्नास खोक्यांचा हिशोब देणार, मुख्यमत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

 

Related Posts